JOIN US
मराठी बातम्या / Viral / तरुणीसमोर हिरोपंती करायला गेला अन् झाली भलतीच फजिती; हा VIDEO पाहून पोट धरून हसाल

तरुणीसमोर हिरोपंती करायला गेला अन् झाली भलतीच फजिती; हा VIDEO पाहून पोट धरून हसाल

एक मुलगी लिफ्ट उघडण्याची वाट पाहत आहे. तेवढ्यात एक मुलगा तिथे येतो आणि मुलीसमोर हिरोगिरी करत डान्सच्या स्टेप्स करण्याचा प्रयत्न करतो.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली 20 मार्च : अनेकदा एखादी व्यक्ती समोरच्याला इम्प्रेस करण्यासाठी काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करते. मात्र काहीवेळा समोरची व्यक्ती प्रभावित होण्याऐवजी स्वतःचीच खिल्ली उडते. मुलींना प्रभावित करण्याच्या नादात यातील बहुतेक प्रसंग मुलांसोबत घडतात. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक मुलगा शेजारी उभ्या असलेल्या मुलीला इम्प्रेस करण्यासाठी असा स्टंट करतो की मुलगी इम्प्रेस होणं तर दुरच, मात्र त्याची अवस्था पाहून हसायला लागते. हा व्हिडिओ (Funny Video Viral) पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही VIDEO: 2 बैलांच्या लढाईदरम्यान मध्येच कुत्र्याची एन्ट्री; पुढे जे घडलं ते बघाच इंस्टाग्रामवर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये दिसतं, की एक मुलगी लिफ्ट उघडण्याची वाट पाहत आहे. तेवढ्यात एक मुलगा तिथे येतो आणि मुलीसमोर हिरोगिरी करत डान्सच्या स्टेप्स करण्याचा प्रयत्न करतो. मात्र, त्याची चप्पल त्याच्या पायावर चढल्याने त्याला यात यश येत नाही आणि त्याचा पाय घसरतो. या व्यक्तीची झालेली फजिती पाहून लिफ्टशेजारी उभा असलेली तरुणीही हसू लागते.

संबंधित बातम्या

हा व्हिडिओ खरा आहे की फनी कंटेंटवर बनवला गेली आहे, हे ,स्पष्ट झालं नाही. मात्र हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनाही हसू आवरत नाहीये. इंस्टाग्रामच्या oterimeme पेजवरुन हा व्हिडिओ शेअर केला गेला असून हजारो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. ‘हा तर भारतीय Iron Man’; हाताने केले दगडाचे 2 तुकडे, VIDEO पाहून नेटकरी अवाक आतापर्यंत 43 हजारहून अधिकांनी हा व्हिडिओ लाईक केला आहे. व्हिडिओ पाहून ही शिकवण मिळते की प्रत्येक ठिकाणी अनावश्यक धाडस दाखवू नका, नाहीतर कधी कधी फासं उलट पडतात. त्यामुळे तुम्ही स्वतःच आपल्या हाताने आपला विनोद बनवून घेता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या