मुंबई, 19 मार्च : साप म्हटलं तरी घाम फुटतो. काहींना सापाची भीती वाटते. तर काहीजण सापासोबत बिनधास्तपणे खेळताना दिसतात. साप पकडणाऱ्या व्यक्ती एकाच वेळी बऱ्याच सापांना हाताळू शकतात. पण हे अनेकदा जीवघेणं ठरू शकतं. असाच एक सापाचा भयानक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे (Snake attack video). एक व्यक्ती एक नव्हे तर तीन-तीन सापांशी खेळताना दिसली. हे साधेसुधे साप नाही तर विषारी किंग कोब्रा आहेत. तिन्ही कोब्रा व्यक्तीसमोर फणा काढून बसले आहेत. ही व्यक्तीसुद्धा या सापांसमोर बिनधास्तपणे बसली आहे आणि सापांसोबत खेळताना दिसते आहे. व्हिडीओत पाहू शकता ही व्यक्ती सापांना मध्ये मध्ये हात लावते. आपले हात सापांसारखे डुलवताना दिसते. सापही या व्यक्तीच्या हालचालींकडे पाहून डुलताना दिसतात. तिन्ही साप त्याच्या हाताकडे पाहून डुलत असतात. अचानक एक साप त्या व्यक्तीवर हल्ला करते. त्या व्यक्तीवर झेप घेत त्याला चावण्याचा प्रयत्न करतो. हे वाचा - पिल्लांना वाचवण्यासाठी खतरनाक कोल्ह्याशी भिडला छोटासा पक्षी; VIDEOचा शेवट शॉकिंग साप आपल्यावर हल्ला करेल, असं या व्यक्तीला वाटलंही नव्हतं. त्यामुळे सुरुवातीला ती तशी बेसावधच होती. पण तरी ही व्यक्ती साप पकडण्यात तरबेज दिसते आहे. कारण सापाने हल्ला केला तरी ती घाबरत नाही. जसा साप हल्ला करतो तशी ही व्यक्ती त्याची शेपटी धरते. सुदैवाने साप त्या व्यक्तीच्या पँटला आपल्या तोंडात धरतो.
आयएफएस अधिकारी सुशांत नंदा यांनी ट्विटर हँडलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात केला आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार कोब्राला नियंत्रणात करण्याची ही भयंकर पद्धत आहे. कोणत्याही हालचालींना साप धोका मानतो, त्यामुळे त्या हालचालीप्रमाणे तो स्वतःही हालचाल करतो. पण ही क्रिया कित्येक वेळा घातक ठरू शकते. हे वाचा - मजा करायला जंगलात गेला चिमुकला; अचानक समोर आला भयंकर प्राणी; काय घडलं पाहा VIDEO व्हिडीओ पाहून सर्वांना धडकी भरली आहे. काहींनी याला मूर्खपणा म्हटलं आहे. तर कुणी या व्यक्तीचं नशीब चांगलं म्हणून तो बचावला, अशी प्रतिक्रिया दिली आहे.