नवी दिल्ली 14 डिसेंबर : सोशल मीडियावर दररोज निरनिराळे व्हिडिओ व्हायरल होत असतात. मात्र यातील काही व्हिडिओ (Emotional Video Viral) असे असतात जे सर्वांनाच भावुक करतात. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Man Saves Life of a Monkey) होत आहे. यात एका व्यक्तीने रस्त्यावरील माकडाचा जीव वाचवल्याचं पाहायला मिळतं. त्याने माकडाचा जीव अशा पद्धतीने वाचवला, जणू एक पिता आपल्या मुलाचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. लसीकरण पथकाला पाहून पळाली महिला; जबरदस्तीने दिली लस, ढसाढसा रडतानाचा VIDEO हा व्हिडिओ ट्विटरवर इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसचे ऑफिसर सुधा रमन यांनी शेअर केला आहे. हा व्हिडिओ क्रिकेटर आर अश्विननेही ट्विट केला आहे. हा व्हिडिओ तमिळनाडूमधील असल्याचं सांगितलं जात आहे. यात दिसतं की एक व्यक्ती दुचाकीवरुन कुठे तरी निघाला आहे. यादरम्यान त्याला रस्त्यावर एक माकड बेशुद्धावस्थेत पडलेलं दिसतं. सुधा रमन यांनी दिलेल्या माहितीनुसार या माकडावर कुत्र्यांना हल्ला केला होता. मिळालेल्या माहितीनुसार हे माकड आठ महिन्यांचं आहे. कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात ते बेशुद्ध झालं आणि रस्त्याच्या कडेलाच ते आपल्या शेवटच्या घटका मोजत होतं. सुधार रमन यांनी दिलेल्या माहितीनुसार, माकडाला वाचवणाऱ्या व्यक्तीचं नाव प्रभू आहे. त्यांनी माकडांना वाचवण्यासाठी फर्स्ट एड पद्धत शिकली होती.
प्रभूने रस्त्याच्या कडेला बेशुद्धावस्थेत पडलेल्या माकडाला अगदी त्याच पद्धतीने वाचवलं जसं एखाद्या माणसाला वाचवलं जातं. त्यांनी आधी माकडाच्या छातीवर जोर देत छाती दाबली. यानंतर व्हिडिओमध्ये प्रभू माकडाला सीपीआर पद्धतीने श्वास देतात. माकडाच्या तोंडात आपल्या तोंडाने हवा भरत ते त्याला वाचवण्याचा प्रयत्न करतात. काही वेळातच त्यांच्या या प्रयत्नाला यश येतं आणि माकड शुद्धीवर येतं. माकडा शुद्धीवर येताच ते त्याला उचलून घेतात आणि उपचारासाठी आपल्यासोबत नेतात. गायीनं गिळली सोन्याची साखळी; शेणातूनही बाहेर न आल्यानं अखेर केलं हे काम प्रभू यांच्या या कामाचं सोशल मीडियावर अनेकांनी कौतुक केलं आहे. काही यूजर्सने कमेंट करत म्हटलं, प्रभूला पाहून वाटतंय की जगात माणुसकी अजूनही बाकी आहे.