JOIN US
मराठी बातम्या / Viral / रेल्वे रुळावर अडकलेला कुत्रा, इतक्यात ट्रेन आली अन्....; अंगावर काटा आणणारा VIDEO

रेल्वे रुळावर अडकलेला कुत्रा, इतक्यात ट्रेन आली अन्....; अंगावर काटा आणणारा VIDEO

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की एक व्यक्ती आपल्या जीवाची पर्वा न करता रेल्वे रुळावर (Dog on Railway Track) अडकलेल्या कुत्र्याला ट्रेनखाली येण्यापासून वाचवतो.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली 24 ऑक्टोबर : अनेकदा असं म्हटलं जातं की माणुसकीपेक्षा मोठा कोणताही धर्म नाही. याच कारणामुळे प्राणी असो वा माणूस संधी मिळताच गरजूंची मदत केली पाहिजे. अनेकदा तर लोक इतरांची मदत करण्यासाठी स्वतःचा जीवही धोक्यात टाकतात. मात्र, अनेक लोक असेही असतात जे समोरचा अडचणी असल्याचं पाहूनही त्याकडे दुर्लक्ष करतात. सध्या एक व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत आहे. यात एका व्यक्तीनं एका कुत्र्याला ट्रेनसमोर (Train) येण्यापासून वाचवल्याचं दिसतं (Man Saved Dog’s Life). डेटिंगसाठी वृद्ध श्रीमंत माणसाला शोधत होती, वेबसाइटवर स्वतःचे वडील सापडले आणि… व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की एक व्यक्ती आपल्या जीवाची पर्वा केल्याशिवाय रेल्वे रुळावर (Dog on Railway Track) अडकलेल्या कुत्र्याला ट्रेनखाली येण्यापासून वाचवतो. हैराण करणारी बाब ही आहे, की काही क्षणांचाही विलंब झाला असता तर हा कुत्रा रेल्वेखाली आला असता.

संबंधित बातम्या

व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की रेल्वेरुळावर एक कुत्रा अडकलेला आहे. इतक्यात समोरून अगदी वेगात ट्रेन येते. हे पाहून व्यक्ती कुत्र्याचा बचाव करण्यासाठी धावतो. हा व्यक्ती रुळाजवळ जात कुत्र्याला तिथून बाजूला करतो. व्हिडिओ जर लक्ष देऊन पाहिला तर समजतं की एखाद्या सेकंदाचा उशिर झाला असता तर हा कुत्रा ट्रेनखाली आली असता. VIDEO:आधी पकडून ठेवलं, मग..; लग्नात मेहुण्यांनी केलेले दाजीचे हाल पाहून चक्रावाल हा हैराण करणारा व्हिडिओ पाहून काही वेळासाठी तुमच्याही हृदयाचा ठोका चुकेल. इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ ‘official_viralclips’ नावाच्या अकाऊंटवरुन शेअर केला गेला आहे. सोबतच अनेकांनी या व्हिडिओवर कमेंट करत आश्चर्य व्यक्त केलं आहे. अनेकांनी कुत्र्याचा जीव वाचवणाऱ्या व्यक्तीचं कौतुक केलं आहे. एका यूजरनं कमेंट करत लिहिलं, अशा लोकांमुळे आज माणुसकी जिवंत आहे. याशिवाय इतरही अनेकांनी या व्यक्तीच्या हिमतीचे कौतुक केलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या