नवी दिल्ली 16 फेब्रुवारी : तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की एखादी गाडी अचानक रस्त्यात खराब झाली तर त्याचा चालक दुसऱ्या गाडीच्या मागच्या सीटवर बसून आपली गाडी पकडून मॅकेनिककडे घेऊन जातो. मात्र तुम्ही कधी एखाद्याला दोन गाड्या एकसोबत चालवताना पाहिलंय का? सोशल मीडियावर सध्या एक असाच व्हिडिओ व्हायरल होत (Stunt Video Viral on Social Media) आहे. हा व्हिडिओ पाहून कोणीही हैराण होईल. अचानक दुचाकीस्वारासमोर उभा ठाकला सिंह; पाहायला मिळालं हैराण करणारं दृश्य, Video व्हिडिओमध्ये एक युवक एकसोबतच दोन बाईक चालवताना दिसतो. तेदेखील गर्दीच्या रस्त्यावर. युवकाचा हा कारनामा पाहून लोक हैराण झाले आहेत. या व्यक्तीला दोन गाड्या एकसोबत चालवताना पाहून लोक तोंडात बोटं घालत आहेत. लोकांनी म्हटलं की असा हेवी ड्रायव्हर आम्ही आजपर्यंत नाही पाहिला. तुम्ही आजपर्यंत अनेक निरनिराळे स्टंट पाहिले असतील. मात्र असा व्हिडिओ तुम्ही कधीच पाहिला नसेल.
व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं की एक व्यक्ती दुचाकीवर बसला आहे आणि एका हाताने तो गाडी चालवत आहे. तर दुसऱ्या हाताने तो दुसरी एक गाडी चालवत आहे. सर्वात हैराण करणारी बाब म्हणजे, तो एखाद्या गल्लीत नाही तर रहदारीच्या रस्त्यावर दोन दुचाकी चालवत आहे. विशेष बाब म्हणजे हा व्यक्ती अगदी मजेत दोन गाड्या एकसोबत चालवत आहे.
या व्यक्तीच्या चेहऱ्यावर अजिबातही भीती दिसत नाही. तो अगदी मजा घेत दोन गाड्या चालवत आहे. व्हिडिओ पाहून असं वाटतं, की हे त्याच्यासाठी अगदी सोपं काम आहे. तो अगदी आरामात दोन बाईक चालवतो. या रस्त्यावर ट्रक, कार आणि भरपूर वाहनंही दिसत आहेत. हा युवक वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन करताना दिसत आहे. त्याच्या डोक्यावर हेलमेटही नाही.