JOIN US
मराठी बातम्या / Viral / VIDEO - खतरनाक प्राण्याच्या पिंजऱ्यात घुसला तरुण आणि...; पुढे जे घडलं ते पाहून विश्वास बसणार नाही

VIDEO - खतरनाक प्राण्याच्या पिंजऱ्यात घुसला तरुण आणि...; पुढे जे घडलं ते पाहून विश्वास बसणार नाही

खतरनाक प्राण्याच्या पिंजऱ्यात घुसून तरुण त्याच्यासमोर छाती ताणून बसला.

जाहिरात

खतरनाक प्राण्यासमोर गेला तरुण.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 25 नोव्हेंबर : वाघ, सिंह, बिबट्या असे प्राणी पाहायला कुणाला आवडत नाही. त्यासाठी आपण मुद्दामहून जंगल सफारी, नॅशनल पार्क किंवा प्राणीसंग्रहायलयात जातो. असे प्राणी समोर दिसले तरी या प्राण्यांच्या अगदी जवळ जाण्याची हिंमत मात्र आपली होत नाही. पण काही लोक असे असतात जे नको ती डेअरिंग करतात. अशाच एका तरुणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. एक तरुण खतरनाक प्राण्याच्या पिंजऱ्यात घुसला आहे. हा प्राणी म्हणजे तरस आहे. जो एक जंगली प्राणी आहे. इतर वन्य प्राण्यांप्रमाणेत तोसुद्धा माणसांवर हल्ला करतो. अशाच प्राण्याच्या पिंजऱ्यात घुसून हा तरुण बिनधास्तपणे तिथेच बसून राहिला (Man playing with hyena in cage). हे फक्त वाचूनच तुम्हाला धडकी भरली असेल. पण पुढे जे घडलं ते यापेक्षाही धक्कादायक आहे. हा व्हिडीओ तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी पाहून तुमचा तुमच्या डोळ्यांवरही विश्वास बसणार नाही. व्हिडीओत पाहू शकता सुरुवातीला तरुण एका पिंजऱ्यात बसलेला दिसतो. तो कुणालातरी हातवारे करून आपल्याकडे बोलावते. इतक्या एक भयानक प्राणी त्याच्याकडे धावत येतो. हा प्राणी तरस आहे. हे वाचा -  दिसताच क्षणी कुत्र्याने तोंडात धरला खतरनाक साप; असा भयानक शेवट की तुम्ही विचारही केला नसेल तरस जवळ येताच व्यक्ती आपले दोन्ही हात मागे घेते आणि मान खाली घालते. तरस त्या व्यक्तीच्या हात तोंडात धरण्याचा प्रयत्न करतो. त्याच्या खांद्यालाही तो चावताना दिसतो. त्यानंतर त्याच्या चेहऱ्याजवळही तो चाटताना दिसतो आणि मग त्या व्यक्तीच्या मांडीवर लोळण घेतो. व्हिडीओ पाहून आपल्याला धडकी भरते. पण या व्यक्तीला त्याची बिलकुल भीती वाटत नाही आहे. तरसही त्या व्यक्तीला तशी दुखापत करताना दिसत नाही. पण काही असलं तरी शेवटी तो हिंस्र प्राणी. त्यामुळे तुम्ही हा व्हिडीओ पाहून असं कोणत्याही प्राण्यासोबत करण्याचा प्रयत्न करू नका. नाहीतर हे तुमच्या जीवावर बेतू शकतं. त्यामुळे अशा ठिकाणी फिरायला गेलात तर सावध राहा. प्राणी कितीही क्युट , शांत वाटले तरी अशा प्राण्यांसमोर जाण्याची हिंमत बिलकुल करू नका. हे वाचा -  ‘‘आ बैल मुझे मार’’ तरुणाचा मुर्खपणा पाहून तुम्ही देखील हेच म्हणाल… Video Viral

african_animal इन्स्टाग्राम अकाऊंटर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. बेस्ट फ्रेंड्स असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे. त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत.

संबंधित बातम्या

तुम्हाला हा व्हिडीओ पाहून काय वाटलं ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन आम्हाला नक्की सांगा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या