JOIN US
मराठी बातम्या / Viral / जबरदस्त जुगाड! सायकललाच बनवलं बुलेट; VIDEO पाहून मोठमोठे इंजिनिअरही होतील अवाक

जबरदस्त जुगाड! सायकललाच बनवलं बुलेट; VIDEO पाहून मोठमोठे इंजिनिअरही होतील अवाक

एका व्यक्तीनं देशी जुगाड करत आपल्या सायकललाच बुलेट एक्सप्रेस बनवलं. ही अजब गाडी सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली 16 नोव्हेंबर : या जगात एकापेक्षा एक जुगाडू लोक आहेत. अशा लोकांची कलाकारी पाहून मोठमोठे इंजिनिअरही चक्रावून जातील. या लोकांची खासियत हीच आहे की ते अगदी निकामी वस्तूंवरही प्रचंड मेहनत घेऊन त्यातून काहीतरी विशेष वस्तू बनवतात. सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झालेला असाच एक जुगाडचा व्हिडिओ (Viral Video) सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. यात दिसतं की एक व्यक्ती सायकलला बुलेट बनवतो (Man Made Bullet from Bicycle). शहीद कर्नल विप्लव यांच्या मुलाचा तो VIDEO; अबीरला सैनिक करण्याचं स्वप्न अधुरच सध्या पेट्रोलच्या किमती भरपूर वाढलेल्या आहेत. या काळात काही लोकांनी महागाईपासून वाचण्यासाठी इलेक्ट्रीक बाईकचा वापर सुरू केला आहे. अशात एका व्यक्तीनं देशी जुगाज करत आपल्या सायकललाच बुलेट एक्सप्रेस बनवलं. ही अजब गाडी सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एका व्यक्तीनं जुगाड करत सायकलला बुलेटता लूक दिला. या व्यक्तीनं रॉयल एनफिल्ड बुलेटचं सीट कव्हर आणि मागील हिस्सा आपल्या सायकलला फिट केला. इतकंच नाही तर ज्या पद्धतीनं तो आपल्या पत्नीला मागे बसवून ड्राईव्हसाठी घेऊन गेला आहे ते पाहून लोक आणखीच हैराण झाले. त्याने पुढे हॅण्डलच्या जागी स्टीयरिंग लावली आहे. हा व्यक्ती जेव्हा ही गाडी घेऊन रस्त्यावरुन चालला होता तेव्हा सगळेच लोक आश्चर्याने त्याच्याकडे पाहत होते.

संबंधित बातम्या

सोशल मीडिया यूजर्सला हा जुगाड भलताच आवडला आहे. अनेकजण हा व्हिडिओ पाहून हैराण झाले तर अनेकांचं असं म्हणणं आहे की हा जुगाड कमालीचा आहे. एका यूजरनं व्हिडिओवर कमेंट करत लिहिलं, खरंच हा जुगाड पाहून माझं डोकं चक्रावलं. याशिवाय इतरही अनेकांनी यावर कमेंट केल्या आहेत.. कारचा दरवाजा उघडला अन् दुचाकीस्वार खाली पडला, टेम्पोने रामला चिरडले, LIVE VIDEO हा व्हिडिओ सोशल मीडिया साईट इन्स्टाग्रामवर ‘upcopmanish’ नावाच्या अकाऊंटवरुन शेअर केला गेला आहे. याला कॅप्शनही देण्यात आलं आहे. आवड जुगाड करुनही पूर्ण करता येते, पूर्ण नाही मात्र काही प्रमाणत तरी समाधान मिळेल, असं यात लिहिलं गेलं आहे. बातमी देईपर्यंत व्हिडिओला शेकडो व्ह्यूज आणि लाईक्स मिळाले होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या