मुंबई, 28 जून : बाहुबली (Bahubali) फिल्म असो किंवा कोणताही अॅक्शन मुव्ही. गाडीसारख्या कितीतरी जड वस्तू हिरो सहजपणे आपल्या दोन्ही हातात उचलताना दिसतो. अर्थात ही सर्व एडिटिंगची कमाल असते प्रत्यक्षात असं कुणीच करू शकत नाही, हे आपणा सर्वांना माहिती आहे. पण हे अशक्यही एका व्यक्तीने प्रत्यक्षात शक्य करून दाखवलं आहे. व्हिडीओ (Viral video) पाहून तुम्हीही शॉक व्हाल. एका व्यक्तीने एक कार सहजपणे उचलून बाजूला (Man lift car) केली आहे. व्हिडीओ पाहून तुम्हीही हैराण व्हाल. या व्यक्तीची तुलना बाहुबलीशी केली जाते आहे. त्याला रिअल लाइफ बाहुबली म्हटलं जातं आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हीसुद्धा या व्यक्तीला रिअल बाहुबलीच म्हणाल.
व्हिडीओत पाहू शकता, एक व्यक्ती रस्त्यावर एका कारसोबत दिसते आहे. ही व्यक्ती दोन्ही हातांनी कारला ढकलण्याचा प्रयत्न करते आहे. सुरुवातीला पाहून आपल्याला हसूच येईल. हातांनी कार कधी सरकेल का, असंच वाटेल. पण व्हिडीओ पुढे पाहिल्यानंतर तुम्ही दंग व्हाल. ही व्यक्ती आपल्या दोन्ही हातांनी कार अगदी सहजपणे उचलते आणि रस्त्याच्या कडेला सरकवून ठेवते. हे वाचा - भारदस्त व्यक्तिमत्व, करारी नजर आणि…;सोशल मीडियावर ‘सिलिंडर मॅन’ची जोरदार चर्चा या रिअल लाइफ बाहुबलीचं सोशल मीडियावर कौतुक होतं आहे. व्हिडीओ पाहून त्यावर खूप कमेंट येत आहेत.