JOIN US
मराठी बातम्या / Viral / VIDEO - तरुणाने उत्साहाच्या भरात सिंहालाच मारली मिठी; त्याने जबड्यात हात धरला आणि...

VIDEO - तरुणाने उत्साहाच्या भरात सिंहालाच मारली मिठी; त्याने जबड्यात हात धरला आणि...

एका भल्यामोठ्या सिंहाला पिंजऱ्यातून बाहेर सोडण्यात आलं, त्याचवेळी तिथं एक व्यक्ती उभी होती जिने सिंहाला मिठीत घेण्याचा प्रयत्न केला.

जाहिरात

सिंह आणि तरुणाचा हैराण करणारा व्हिडीओ.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 07 सप्टेंबर : सिंह याला जंगलाचा राजा म्हणतात. ज्याच्यासमोर जंगलातील भलेभलेही प्राणीही गार पडतात. माणसांनी तर त्याच्यासमोर जाण्याचा विचारही करायला नको. तरी किमान एकदा तरी त्याला पाहण्याची इच्छा असते त्यामुळे आपण प्राणीसंग्रहायल, नॅशनल पार्क, जंगल सफारीवर जातो. झूमध्ये पिंजऱ्यात असलेल्या सिंहांशी पंगा घेणाऱ्या व्यक्तींचं सिंहांनी काय केलं आहे, याची प्रकरणं तुम्हाला माहिती असतील. मग विचार करा. असा सिंह पिंजऱ्याबाहेर आला तर… असाच एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. एका भल्यामोठ्या सिंहाला पिंजऱ्यातून बाहेर सोडण्यात आलं. त्याचवेळी एक व्यक्ती तिथं छाती ताणून, हात पसरून उभी होती. या व्यक्तीला पाहताच सिंह वेगाने त्या व्यक्तीकडे धावत गेला. तिच्यावर उडी मारली आणि पुढे जे घडलं ते धक्कादायक आहे. व्हिडीओत पाहू शकता एक व्यक्ती एक पिंजरा उघडते. त्या पिंजऱ्यात एक सिंह असतो. भलामोठा सिंह… जसा पिंजऱ्याचा दरवाजा उघडतो तसा सिंह त्यातून धावत बाहेर येतो. आपल्या सुटकेचा त्याला इतका आनंद होतो की अगदी लहान मुलासारखा तो उड्या मारताना दिसतो. त्याचवेळी त्याचा पाय घसरतो आणि तो पडतो. त्याचवेळी समोर एक व्यक्ती छाती ताणून हात पसरून उभी आहे. सिंहाला पाहताच या व्यक्तीलाही इतका आनंद होतो की सिंहाला आपल्याकडे बोलावते आणि उत्साहाच्या भरात मिठी मारते. हे वाचा -  VIDEO - शिकार करायला आलेल्या सिंहाची साध्या झेब्राने केली भयानक अवस्था; धक्कादायक शेवट आता शेवटी तो सिंह. माणसाने मिठीत घेताच सिंह त्याचा हात आपल्या जबड्यात धरतानाही दिसतो. बऱ्याच वेळा तो या व्यक्तीला चावताना दिसतो. पण व्यक्ती बिलकुल घाबरत नाही. उलट तिच्या चेहऱ्यावर आनंद आणि उत्साह दिसतो आहे. पण सिंहाने जबड्यात हात धरताच ती आपला हात मागे घेते. पण जसं कुत्रे, मांजरं यांना गोंजारावं तशी ती चक्क सिंहाला गोंजारताना, त्याचे लाड करताना दिसते.

संबंधित बातम्या

सिंहाने व्यक्तीचा हात जबड्यात धरल्याचं सोडल्यास बाकी सिंह या व्यक्तीला काहीही करत नाही. एकंदर व्हिडीओ पाहता दोघांमध्येही मैत्री असल्याचं दिसतं. बऱ्याच दिवसांनी दोघं एकमेकांना भेटले आणि त्याचाच आनंद त्यांना झाला आहे. दोघंही एमेकांसोबत मस्ती करत आहेत. थोड्या वेळाने सिंह त्या व्यक्तीपासून थोड्या अंतरावर दूर जाऊन उभा राहतो. हे वाचा -  Zoo मधून पळालेला चिंपांझीचे नखरेच भारी, अनेक विनंत्या करुन देखील परतायला तयार नाही, अखेर… पाहा Video claggies.v1 इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. हा व्हिडीओ नेमका कुठला आणि कधीचा आहे माहिती नाही. व्हिडीओ पाहून नेटिझन्स हैराण झाले आहेत. तितकाच हा व्हिडीओ सर्वांना आवडला आहे. एका युझरने ही व्यक्ती गेल्या जन्मात सिंह असावी अशी कमेंट केली आहे. तर एकाने जंगली प्राण्यांनाही मन, भावना असतात असं म्हटलं आहे. काहींनी सिंहाचा लहान मुलांसारखा घसरण्याचा अंदाज आवडला आहे. तुम्हाला हा व्हिडीओ पाहून काय वाटलं ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन आम्हाला नक्की सांगा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या