प्रतिकात्मक फोटो
नवी दिल्ली 26 एप्रिल : आजच्या काळात जगात फार कमी प्रामाणिक लोक उरले आहेत. बहुतेक लोक अतिशय स्वार्थीपणाने जगतात. लोकांना आपल्या गरजेपुढे इतरांच्या समस्याही दिसत नाहीत. अशावेळी कुठून तरी प्रामाणिकपणाची घटना समोर आली तर त्यावर विश्वास बसणं कठीण जातं. सोशल मीडियावर मँचेस्टरचे रहिवासी अँडी इव्हान्सने त्यांच्यासोबतचा एक प्रसंग शेअर केला आहे, ज्यानंतर लोकांना पुन्हा अजूनही जगात प्रामाणिक लोक आहेत, यावर विश्वास बसला आहे. या घटनेत सात वर्षांपूर्वी अँडीचं पाकीट टॅक्सीत हरवलं होतं. मात्र आता इतक्या वर्षांनंतर त्याला हे पाकीट जसंच्या तसं परत मिळालं आहे (Man got his Lost Purse after 7 Years). 10 रुपयांच्या नोटेवरील हटके Love Story Viral! GF Kusum च्या मेसेजवर BF Vishal चा भन्नाट रिप्लाय एका मुलाचे वडील असलेल्या अँडी यांनी सांगितलं की, इतक्या वर्षांनंतरही जेव्हा त्यांना पाकिटातील सर्व पैसे सापडले, तेव्हा यावर त्यांचा विश्वासच बसत नव्हता. यातील काही नोटा तर आजच्या काळात बंदही झाल्या आहेत. जून 2015 मध्ये सिनेमा हॉलमधून सिनेमा पाहून घरी परतत असताना अँडीची पर्स टॅक्सीत पडली होती. पण इतक्या वर्षांनी त्यांचं पाकीट त्यांना जसंच्या तसं परत मिळालं. त्यांच्या पाकिटात ड्रायव्हिंग लायसन्स, बँकेचं कार्ड आणि सुमारे 13 हजार रुपये होते.
जून 2015 मध्ये जेव्हा अँडीचं पाकीट हरवलं होतं. त्यानंतर त्याला एवढंच आठवत होतं की ही टॅक्सी काळी होती. ती कोणत्या फर्मची होती, हे त्याला आठवत नव्हतं. यामुळे कधीतरी आपलं पाकीट परत मिळेल ही आशा त्याने सोडून दिली होती. पण गेल्या आठवड्यातच एका कुरिअरने त्याला एक पार्सल मिळालं, ज्यामध्ये त्याचं पाकीट होतं. हे पाहून त्याचा त्याच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. मात्र हे सत्य होतं की हे पाकीट सात वर्षांनंतर सुखरूप त्याच्यापर्यंत पोहोचलं होतं.. 34 वर्षांपासून लॉटरी तिकीट खरेदी करत होता व्यक्ती; अचानक नशीब पालटलं अन् आयुष्यच बदललं अँडीने सांगितलं की या पाकीटाला हातही लावला गेला नव्हता. त्यात सर्व कार्ड आणि रोख रक्कम तशीच होती. त्यात असलेल्या अनेक नोटा आणि नाणी आता चलनात नसल्या तरी काही मात्र अजूनही वापरात असणाऱ्या आहेत. अँडीने सांगितलं की, तो अशा नोटा आणि नाणी बँकेत जाऊन एक्सचेंज करून घेणार आहे, जी सध्या चलनात नाहीत.मात्र, त्याच्या बँक कार्डची मुदत आता संपली आहे. एवढ्या वर्षांनी त्याचं पाकीट सापडलं यावर त्याचा विश्वास बसत नसल्याचं अँडीने सांगितलं. पाकीटासोबत अँडीला एक चिठ्ठीही मिळाली, ज्यामध्ये जुन्या टॅक्सीत हे पाकीट मिळाल्याचं लिहिलं होतं.