मुंबई, 22 एप्रिल : लग्नाच्या वरातीत तुम्ही बऱ्याच प्रकारचे डान्स पाहिले असतील (Wedding Dance Video). कुणी गणपती डान्स करतं, कुणी नागिण डान्स करतं, तर कुणी इतकं विचित्र नाचतं की नेमका हा कोणता डान्स आहे तेच समजत नाही (Funny Dance Video). सध्या अशाच एका डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. एका व्यक्तीने लग्नाच्या वरातीत असा डान्स केला आहे, की आता याला नेमका कोणता डान्स म्हणायचं असा प्रश्न पडला आहे. प्रत्येक जण प्रोफेशनल डान्सर नसतो. डान्सचं प्रशिक्षण घेतलं नसलं तरी नाचता सर्वांना येतं. गाणं लागलं, बँडबाजाचा आवाज कानावर पडला की आपोआप शरीर थिरकू लागतं आणि मग गाणं किंवा बँडच्या तालावर ताल धरला जातो. असाच हा व्हिडीओ आहे. पण या व्यक्तीने ढोलच्या तालावर असा डान्स केला आहे की पाहून सर्वांना आश्चर्य वाटतं आहे. याला डान्स म्हणाचं की आणखी काही, तेच समजत नाही आहे. अवघ्या 26 सेकंदाचा हा व्हिडीओ आहे. व्हिडीओत पाहू शकता ढोल वाजवला जातो आहे आणि एक व्यक्ती एकटीच या ढोलवर नाचताना दिसते आहे. आता या व्यक्तीचा डान्सच इतका विचित्र आहे की इतर लोक स्वतः डान्स करण्याऐवजी त्या व्यक्तीचाच डान्स पाहण्यात दंग झाले आहेत. हे वाचा - लय भारी! चिमुकल्याचा हा जबरदस्त VIDEO पाहिल्यानंतर तुम्ही नाचल्याशिवाय राहणार नाही हा व्यक्ती डान्स स्टेप्स नाही तर परेड आणि पीटी करताना दिसतो आहे. कधी उभं राहून एक्सरसाइझ करतो, कधी सॅल्युट मारतो. पण त्याने हे सर्व अशा पद्धतीने केलं आहे की तो एक वेगळा डान्सच वाटावा. ढोल वाजवणाराही या व्यक्तीचा डान्स कौतुकाने पाहतो आहे आणि त्यालाही ढोल वाजवताना जास्त मजा येत आहे.
आयपीएस अधिकारी दिपांशू काबरा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. ट्रेनिंग संपल्यानंतर जवान आपल्या मित्राच्या वरातीत पोहोचला, असं कॅप्शन त्यांनी या व्हिडीओला दिलं आहे. हे वाचा - तूने मारी एंट्री और…! नवरीबाई येताच सर्वांना भरली धडकी; कधीच पाहिली नसेल इतकी जबरदस्त Bridal Entry या व्हिडीओवर बऱ्याच कमेंट येत आहेत. एका युझरने अशा डान्समुळे आरोग्य सुधारेल आणि शिस्तही पाहायला मिळेल, असं म्हटलं आहे. तर एकाने कुणी सावधान बोललं तर डान्स थांबेल, अशी कमेंट केली आहे. हा डान्स पाहून तुम्हाला नेमकं काय वाटतं हे आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन नक्की सांगा.