JOIN US
मराठी बातम्या / Viral / चमत्कार! कार रेसिंगमध्ये अचानक हवेत उडू लागला माणूस; विश्वास बसत नाही तर पाहा VIDEO

चमत्कार! कार रेसिंगमध्ये अचानक हवेत उडू लागला माणूस; विश्वास बसत नाही तर पाहा VIDEO

कार रेसिंग सोडून हवेत उडणाऱ्या माणसाकडे सर्वांच्या नजरा वळल्या.

जाहिरात

कार रेसिंगमध्ये हवेत उडणारा माणूस.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 31 ऑगस्ट : आकाशात किंवा हवेत उडायला कुणाला आवडणार नाही. पक्ष्यांप्रमाणे आकाशात उडणं आता तसं माणसांनाही शक्य झालं आहे. यासाठी विमान, पॅराशूट, हॉट एअर बलून असे पर्याय उपलब्ध आहेत. पण तरी याचा वापर न करता अगदी पक्ष्यासारखं स्वच्छंद उडता येणं शक्य झालं तर… असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. या व्हिडीओने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. एका कार रेसिंगमध्ये एक व्यक्ती अचानक हवेत उडू लागला. बेल्जियन ग्रँड प्रिक्सदरम्यानची ही घटना. या घटनेने सर्वांनाच धक्का दिला आहे. फॉर्म्युला वन रेसमध्ये या व्यक्तींने रेस पाहायला आलेल्या सर्वांचं लक्ष आपल्याकडे खेचून घेतलं. प्रेक्षकांसह रेस रेकॉर्ड करायला आलेले कॅमेरेही या व्यक्तीच्या दिशेने वळले.व्हिडीओत पाहू शकता कार रेसिंग सुरू आहे. वर एक माणूस हवेत उडताना दिसतो. खाली गाड्या धावत असतात तर ट्रॅकच्या वर एक व्यक्ती हवेत उडताना दिसते. हे वाचा -  ना पॅराशूट ना हॉट एअर बलून; पक्ष्यासारखे पंख पसरून उडू लागला माणूस; पाहा अद्भुत VIDEO या व्यक्तीने पॅराशूट घातलेलं दिसत नाही किंवा तो हॉट एअर बलूनमध्ये नाही. मग तो कसं काय हवेत उडतो असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर ही व्यक्ती फ्लाइंग बोर्डवर आहे.

संबंधित बातम्या

या व्यक्तीचं नाव फ्रँकी जापाटा आहे. तो एक फ्रेंच इन्वेन्टर आहे. ला सोर्स कॉर्नरहून त्याने उड्डाण भरलं. 400 मीटर कोणताही यू टर्न न घेता तो उडत होता. त्याचवेळी ते कार रेसिंग ट्रॅकवरूनही उडत गेला. तेव्हा कार रेसिंग सोडून सर्वांचं लक्ष या माणसाकडे गेलं. हे वाचा -  ही तर ‘स्पायडर गर्ल’, Viral Video पाहून अनेकांना फुटला घाम @avoidingtmrw ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.  रिपोर्ट नुसार जापाटाने हे पहिल्यांदा केलंलं नाही. याआधी 2019 साली एफ 1 ट्रॅकवरून तो उडाला होता. त्यावेळी त्याने फ्रेंच ड्राइव्हर अँथोनी ह्युबर्टला श्रद्धांजली दिली होती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या