JOIN US
मराठी बातम्या / Viral / स्विमिंग पुलमध्ये कोसळलेल्या श्वानाला वाचवायला गेला मालक; अचानक पाय घसरला अन्.., VIDEO

स्विमिंग पुलमध्ये कोसळलेल्या श्वानाला वाचवायला गेला मालक; अचानक पाय घसरला अन्.., VIDEO

या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती आपल्या घराच्या मागील बाजूस काहीतरी काम करताना दिसत आहे. त्याला लागूनच एक स्विमिंग पुलही दिसतो. तर त्याच्या शेजारीच एक छोटा श्वानही खेळताना दिसतो.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली 20 मार्च : सोशल मीडिया हे व्हिडिओंचं भांडार आहे. इथे तुम्हाला मजेदार, प्रेरणादायी, धक्कादायक, संतप्त आणि विचित्र व्हिडिओ सहज पाहायला मिळतील. परंतु त्यापैकी सर्वात खास आणि मजेदार असतात प्राण्यांचे व्हिडिओ (Funny Animal Videos). नुकताच अमेरिकेतील असाच एक व्हिडिओ खूप चर्चेत आहे. यात लोकांना श्वानाची मस्ती मजा आणि त्याच्या मालकाचा मजेदार ‘अपघात’ पाहायला मिळतो. हा व्हिडिओ लोकांच्या चांगलाच पसंती उतरत आहे. रहदारीच्या रस्त्यावर चालत्या गाडीत केली चोरी; VIDEO पाहून चक्रावून जाल अप्रतिम आणि मजेदार व्हिडिओंसाठी प्रसिद्ध सोशल मीडिया अकाऊंट व्हायरल हॉगने अलीकडेच एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, जो पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. अमेरिकेतील अॅरिझोना येथील या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती आपल्या घराच्या मागील बाजूस काहीतरी काम करताना दिसत आहे. त्याला लागूनच एक स्विमिंग पुलही दिसतो. तर त्याच्या शेजारीच एक छोटा श्वानही खेळताना दिसतो.

संबंधित बातम्या

अचानक एक कुत्रा धावत येतो आणि दुसऱ्या कुत्र्यासोबत खेळत असताना स्विमिंग पूलमध्ये पडतो. कुत्रा तलावात पडताना मालकाला दिसताच तो त्याला बाहेर काढण्यासाठी पुढे जातो. दरम्यान, कुत्राही पाण्यात आरामात पोहताना दिसत आहे. तो मालक पाण्याजवळ जातो पण त्याचा पाय घसरतो आणि तो थेट पाण्यात पडतो (Man Falls in Swimming Pool While Saving Dog). खाली वाकून कुत्र्याला पकडताना त्याचा तोल बिघडला आणि तो पाण्यात पडला.

चवताळलेल्या बैल वेगात मागे धावू लागला अन्…; काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO

या व्हिडिओला आतापर्यंत ४५ हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तर अनेकांनी कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने लिहिलं की हा व्हिडिओ खूपच मजेदार आहे तर दुसऱ्याने म्हटलं की, माणूस कुत्र्याला वाचवण्याऐवजी त्याला बुडवताना दिसत आहे. आणखी एकाने लिहिलं की, कुत्रा जीव वाचवून पाण्यात पोहत होता आणि या व्यक्तीला त्याला वाचवण्याची गरज नव्हती. एकाने चिंता व्यक्त करत म्हटलं की मुलं आणि पाळीव प्राणी यांच्यासाठी स्विमिंग पूल खूप धोकादायक असू शकतात. त्यामध्ये सेफ्टी गेट्स बसवणे आवश्यक आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या