JOIN US
मराठी बातम्या / Viral / हँडल न पकडता रस्त्याच्या मधोमध चालवत होता दुचाकी; अचानक आरामात झोपला, VIDEO पाहून व्हाल शॉक

हँडल न पकडता रस्त्याच्या मधोमध चालवत होता दुचाकी; अचानक आरामात झोपला, VIDEO पाहून व्हाल शॉक

व्हिडिओमध्ये एका व्यक्तीने रस्त्यावर दुचाकीसह धोकादायक स्टंट केला आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हालाही असं वाटेल की या व्यक्तीचा कोणत्याही क्षणी अपघात होऊ शकतो.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली 11 जून : रस्त्यावर स्टंट करणं किती धोकादायक आहे याची जाणीव तुम्हाला असेलच. रस्त्यावर स्टंट करताना अनेकदा लोक जखमी होतात. अनेक वेळा लोकांना जीव गमवावा लागतो. एवढंच नाही तर त्यांच्यामुळे इतरांनाही अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे स्टंट करण्याची अतिशय गरजच भासलीच तरी हे करताना अतिशय सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे. सध्या एका व्यक्तीचा स्टंट करतानाचा व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. हा व्यक्ती हँडल न धरता रस्त्याच्या मधोमध बाइक चालवताना दिसतो. रोमँटिक प्रपोजचा अनपेक्षित शेवट; कॅमेऱ्यात कैद झाला तो विचित्र क्षण, पाहा VIDEO नुकताच The Talon नावाच्या फेसबुक पेजवर एक व्हिडिओ (Bike Stunt on Road) शेअर करण्यात आला आहे जो खूपच आश्चर्यकारक आहे. याचं कारण म्हणजे व्हिडिओमध्ये एका व्यक्तीने रस्त्यावर दुचाकीसह धोकादायक स्टंट केला आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हालाही असं वाटेल की या व्यक्तीचा कोणत्याही क्षणी अपघात होऊ शकतो. मात्र सुदैवाने तो कोणत्याही अपघाताला बळी पडलेला दिसत नाही, परंतु तरी त्याने केलेली कृती भीतीदायक आहे.

संबंधित बातम्या

व्हिडिओमध्ये एक व्यक्ती खूप जड दिसणारी बाईक चालवताना दिसत आहे. तो अगदी आरामात हँडलवरून हात काढतोय आणि मग बाईकवर मागे झुकतोय. बाईक इतकी जड आहे की ती स्थिर चाललेली आहे. मध्येच तो बाईकवर पूर्णपणे झोपलेला दिसतो. त्याच्या शेजारुन इतरही गाड्या जाताना दिसतात. एका दुचाकीवर 10 जण करत होते प्रवास; अचानक पुढचं चाक हवेत उचललं अन्…, पाहा VIDEO या व्हिडिओला २ कोटींहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत तर २ लाखांहून अधिक लोकांनी व्हिडिओ लाइक केला आहे. या व्हिडिओवर अनेकांनी प्रतिक्रियाही दिल्या आहेत. एका व्यक्तीने म्हटलं की, या व्यक्तीला बाईक चालवताना पाहून समजतं की त्याला दुचाकी कशी चालवायची हे खूप चांगल्या पद्धतीने माहिती आहे. तर दुसऱ्या एकाने कमेंट करत म्हटलं की अशा लोकांवर गाडी चालवण्यास बंदी घातली पाहिजे. तर आणखी एकाने म्हटलं की याचे ड्रायव्हिंग लायसन्स रद्द व्हायरल हवे. इतरही अनेकांनी या व्हिडिओवर निरनिराळ्या कमेंट केल्या आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या