नाचता नाचता मृत्यू.
लखनऊ, 02 सप्टेंबर : मृत्यू कुणाच्याच हातात नाही. तो कधी कुठे कसा कुणाला गाठेल सांगू शकत नाही. असाच मृत्यूचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. एका व्यक्तीला नाचता नाचता मृत्यूने गाठलं आहे. पार्टीत नाचता नाचता ही व्यक्ती जमिनीवर अचानक कोसळली ती पुन्हा उठलीच नाही. या व्यक्तीचा मृत्यू झाला. उत्तर प्रदेशच्या बरेलीतील ही धक्कादायक घटना आहे. प्रभार कुमार असं या मृत व्यक्तीचं नाव असल्याचं सांगितलंं जातं आहे. गुरुवारी रात्री ते आपल्या मित्राच्या बर्थडे पार्टीला गेले होते. तिथं आपल्या डान्सचा जलवा सर्वांना दाखवत होते. ‘एक लड़की चाहिये खास-खास’ या बॉलिवूड गाण्यावर ते थिरकताना दिसले. त्यांना जबरदस्त डान्स करताना पाहून पार्टीतील इतर लोक त्यांचा उत्साह वाढवत होते. हे वाचा - Shocking Video! लग्नात नाचता नाचता अचानक गेला व्यक्तीचा जीव; कॅमेऱ्यात कैद झाला ‘मृत्यू’ 45 सेकंदाचा हा व्हिडीओ आहे. ज्यात ते 35 सेकंद प्रभात नाचताना दिसत आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर कोणताच थकवा, घाम किंवा भीती दिसत नाही आहे. आनंद आणि उत्साहच दिसतो आहे. 36 व्या सेकंदाला ते अचानक जमिनीवर कोसळले. त्यांचं डोकं जमिनीला आपटतं.
@abhishe88277831 ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. मीडिया रिपोर्ट नुसार तिथं उपस्थित डॉक्टरांनी त्यांना सीपीआरसारखा प्राथमिक उपचार देण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्या शरीरात काहीच हालचाल जाणवली नाही. शेवटी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं पण तिथं त्यांना मृत घोषित करण्यात आलं. हे वाचा - लग्नाच्या वरातीत मनसोक्त डान्स करत असतानाच वृद्धाचा मृत्यू, धक्कादायक घटनेचा Live Video त्यांचा मृत्यू हार्ट अटॅकमुळे झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं . पण डान्स करताना त्यांच्या हार्ट अटॅकची कोणती लक्षणं दिसून येत नाही आहेत. ना ते घाबरल्यासारखे दिसले ना त्यांना वेदना जाणवल्याचं दिसलं. डान्स स्टेप करण्यासाठी म्हणून ते गुडघ्यात वाकणार तोच खाली पडले आणि त्यांचा मृत्यू झाला.