प्रतीकात्मक फोटो
नवी दिल्ली 27 डिसेंबर : जीव वाचवण्यासाठी काम करणाऱ्या डॉक्टरांना पृथ्वीवर देवाचा दर्जा देण्यात आला आहे. अनेक वेळा गंभीर आजारांमुळे लोक मृत्यूच्या उंबरठ्यावर असतात, मात्र डॉक्टर उपचाराने त्यांचे प्राण वाचवतात. प्रत्येक लहान-मोठ्या आजारावर डॉक्टरांकडे येऊन उपचार केले जातात. परंतु अनेकवेळा असंही घडतं की, डॉक्टरांकडून चुका होतात, ज्याचा परिणाम माणसावर खूप भयंकर होतो. आजकाल असंच एक प्रकरण चर्चेचा विषय बनलं आहे, ज्यामध्ये डॉक्टरांची चूक एका व्यक्तीसाठी शाप ठरली आहे. या एका छोट्याशा किड्यामुळे महिलेची 13 वर्ष मृत्यूशी झुंज; तुमच्याही आसपास असेल तर सावधान! डॉक्टरांच्या चुकीमुळे या व्यक्तीला आपला प्रायव्हेट पार्ट काढावा लागला. होय, ही गोष्ट तुम्हाला विचित्र वाटत असली तरी, हे अगदी खरं आहे. मात्र, डॉक्टरांची चूक समोर आल्यानंतर चौकशी करण्यात आली. हे प्रकरण कोर्टात पोहोचलं आणि आता कोर्टाने हॉस्पिटलला पीडित व्यक्तीला 54 लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. हे आश्चर्यकारक प्रकरण फ्रान्सचं सांगितलं जात आहे. स्थानिक रॅग फ्रेंचब्लू नावाच्या वेबसाइटशी बोलताना पीडित व्यक्ती म्हणाला की, ‘आता मी उपचाराच्या नावाखाली धोकादायक प्रक्रिया निवडणाऱ्या डॉक्टरांचा तिरस्कार करतो. तो माझा एकही शब्द ऐकायला तयार नव्हता.’ रिपोर्ट्सनुसार, हा माणूस 30 वर्षांचा आहे आणि तो तीन मुलांचा बापही आहे. तपासादरम्यान त्याला carcinoma नावाच्या आजाराने ग्रासलेलं आढळलं, जो एक प्रकारचा कर्करोग आहे. 2014 मध्ये त्याच्यावर नॅन्टेस युनिव्हर्सिटी हॉस्पिटलमध्ये या आजारावर उपचार करण्यात आले होते, मात्र शस्त्रक्रियेदरम्यान डॉक्टरांकडून काही चुका झाल्या. त्यामुळे कॅन्सर व्यक्तीच्या प्रायव्हेट पार्टमध्येही पसरला. त्याला भयंकर वेदना होऊ लागल्या, म्हणून एकदा त्याने स्वतःचा प्रायव्हेट पार्ट काढण्याचा प्रयत्न केला. पण त्याच्या पत्नीने त्याला तसे करण्यापासून रोखले. स्टेजवर कोसळला अन् काही सेकंदातच गेला कलाकाराचा जीव; मृत्यूचा हृदय पिळवटून टाकणारा Live Video डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, काही महिन्यांतच त्या व्यक्तीची गाठ इतकी वाढली होती की, त्याचा प्रायव्हेट पार्ट काढण्याशिवाय त्याच्याकडे दुसरा पर्याय नव्हता. कारण तसं केलं नसतं तर त्याचा मृत्यू झाला असता. पण नंतर डॉक्टरांना लक्षात आलं की या व्यक्तीचा आजार समजून घेण्यात आपली चूक झाली. मात्र, तोपर्यंत त्या व्यक्तीचा प्रायव्हेट पार्ट त्याच्या शरीरापासून वेगळा झाला होता. वृत्तानुसार, या प्रकरणी त्या व्यक्तीने रुग्णालयाकडे 9 कोटी रुपयांची नुकसानभरपाई म्हणून मागणी केली होती, परंतु नंतर न्यायालयाने त्याला सुमारे 54 लाख रुपये नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले.