JOIN US
मराठी बातम्या / Viral / बोंबला! खाताही येईना अन् विकताही; बोकडाबाबत तक्रार, मालकाची पोलिसात धाव

बोंबला! खाताही येईना अन् विकताही; बोकडाबाबत तक्रार, मालकाची पोलिसात धाव

बोकडाबाबत मालकाला असं सत्य समजलं की त्याने थेट पोलीस ठाणं गाठलं.

जाहिरात

प्रतीकात्मक फोटो (सौजन्य - Canva)

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

लखनऊ, 14 डिसेंबर : पोलिसात हत्या, चोरी, हाणामारी याचे गुन्हे दाखल होता. काही किरकोळ वादाच्याही तक्रारी येतात. पण काही प्रकरणं इतकी विचित्र असतात की त्याच आश्चर्य वाटतं. असंच उत्तर प्रदेशमधील एक प्रकरण चर्चेत आलं आहे. एक व्यक्ती आपल्या काळ्या बोकडाला घेऊन पोलिसात गेला. या बोकडाबाबत असं सत्य समोर आलं की मालक हादरला. त्याने थेट पोलिसात तक्रार केली. बरेलीतील ही घटना. इथं राहणाऱ्या बाबूराम नावाच्या व्यक्तीने एक बोकड खरेदी केलं. या बोकडाचे 5 हजार रुपये त्याने दिले. पण नंतर या बोकडाबाबत त्याला असं काही समजलं की धक्काच बसला. ज्या व्यक्तींनी त्याला बोकड विकलं त्यांनी आपली फसवणूक केल्याचा आरोप त्याने केला आहे. हे वाचा -  चखन्यासाठी दारूड्यांचा भयंकर कांड; फक्त वाचूनच दारू पिणाऱ्यांचाही होईल संताप बाबूरामच्या तक्रारीनुसार हे बोकड जंगलात होतं. शेजारील गावातील ग्रामस्थांनी नवस पूर्ण झाल्याने हे बोकड जंगलात सोडलं होतं. धार्मिक मान्यतेनुसार नवस फेडण्यासाठी दिलेलं बोकड कापून खाता येत नाही किंवा विकताही येत नाही. हे समजताच त्याने ज्यांच्याकडून बोकड खरेदी केलं, त्यांच्याकडून आपले पैसे पुन्हा मागितले, तेव्हा त्यांनी त्याला धमकी दिली. म्हणून तो बोकड घेऊन पोलिसात गेला आणि तिथं तक्रार केली. हे बोकड चोरून फसवून आपल्याला विकण्यात आल्याचं त्याने सांगितलं. दरम्यान तुम्हाला हे प्रकरण विचित्र वाटत असलं तरी पोलिसांनी ते गांभीर्याने घेतलं आहे. या प्रकरणाची दखल घेत तक्रार नोंदवून घेतली आहे. तपास सुरू केला आहे आणि बाबूरामला लवकरात लवकर न्याय मिळवून देण्याचं आश्वासन दिलं आहे. हे वाचा -  भरमंडपात दे दणादण! नवरा-नवरीनेच एकमेकांना धू-धू धुतलं; असं झालं तरी काय Watch Video तुमची या प्रकरणाबाबत काय प्रतिक्रिया आहे ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये द्या.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या