फ्लोरिडा, 30 सप्टेंबर : टीव्हीवर पॉप्युलर शो मॅन वर्सेस वाइल्ड (Man vs Wild) अनेकांनी पाहिला असेल. पण अमेरिकेतील फ्लोरिडामध्ये एका व्यक्ती आणि मगरीमध्ये खरोखरच मॅन वर्सेस वाइल्ड पाहायला मिळालं. सोशल मीडियावर मगरीला पकडण्याचा थरारक व्हिडीओ व्हायरल (Social Media Viral Video) होत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये एका घराबाहेरच मगर आल्याचं दिसतंय. या मगरीला पकडण्याचा हा थरारक व्हिडीओ आहे. व्हिडीओत दिसणारा व्यक्ती एका मोठ्या कचऱ्याच्या डब्ब्यात मगर पकडण्याचा प्रयत्न करत आहे. व्यक्ती जसजसं मगरीसमोर डस्टबिन पुढे करतो, तसं मगर मागे मागे सरकते. त्या व्यक्तीला घाबरवण्याचा प्रयत्न करते. जमिनीवर डस्टबिन आडवा पाडून काही अंतरावर तो सरकवत व्यक्ती मगरीला आत येण्यासाठी प्रयत्न करतो. पण कितीतरी वेळ मगर डब्ब्यात येत नसल्याचं व्हिडीओमध्ये दिसतंय.
काही काळ हा प्रकार सुरू राहतो, शेवटी तो व्यक्ती डब्ब्याचं झाकण झाली ढकलतो. त्यानंतर शेवटी मगर डब्ब्यात आत शिरते. त्यानंतर डस्टबिन उभा करुन त्याचं झाकण बंद करण्यात व्यक्तीला यश मिळतं.
ट्विटरवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. एका ian bremmer नावाच्या ट्विटर युजरने हा व्हिडीओ पोस्ट करत त्याला Man vs Wild असं कॅप्शन दिलं आहे. या व्हिडीओवर अनेक युजर्सनी विविध प्रतिक्रिया दिल्या असून आश्चर्य व्यक्त केलं आहे.
याआधीही इंग्लंडच्या यॉर्कशायरमध्ये अशी प्रकारची घटना समोर आली होती. आपल्या घरासमोर 4 फूट लांब मगरीला फिरताना पाहून एक महिला अतिशय घाबरली होती. घाबरुन तिने कित्येक तास स्वत:ला घराच्या बेडरुममध्ये बंद करुन घेतलं होतं. परंतु या व्यक्तीने अतिशय धाडस दाखवत यशस्वीरित्या मगरीला कैद केलं.