JOIN US
मराठी बातम्या / Viral / प्रेमासाठी कायपण! गर्लफ्रेंडला प्रपोज करण्यासाठी अवलियानं तयार केला Video Game आणि...

प्रेमासाठी कायपण! गर्लफ्रेंडला प्रपोज करण्यासाठी अवलियानं तयार केला Video Game आणि...

होकारासाठी काय पण! गर्लफ्रेंडला प्रपोज करण्यासाठी फिल्मी स्टाईल अवतार, पाहा VIDEO.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

प्रेमासाठी चंद्र-तारे तोडेन किंवा आकाश पाताळ एक करेन अशा बाता करणारे तुम्हाला माहित असतील. तसेच, सिनेमांमध्ये केवळ आपल्या गर्लफ्रेंडला प्रपोज करण्यासाठी कोणत्याही थरावर हिरो जात आहे, अशी सीन असतात. हे पाहून प्रेक्षकही कधी खऱ्या आयुष्यात हे सगळे प्रकार करतात. पण आपल्या खऱ्या प्रेमासाठी किती तरूण काही तरी वेगळा प्रयोग करतात? यांची संख्या कमी असली तरी, असे अवलिये आजही आहेत. आपल्या गर्लफ्रेंडला प्रपोज करण्यासाठी एका अवलियानं चक्क व्हिडीओ गेम तयार केला आणि शेवटची माझ्याशी लग्न करशील का? असा प्रश्न विचारला. याआधी चीनमध्ये एका गर्लफ्रेंडनं आपल्या मित्राला प्रपोज करण्यासाठी BMW गाडीची चावी भेट दिली होती. आता तर, डेनिस वेल्सने आपला जोडीदार चेयनेला प्रपोज करण्यासाठी युट्युबवर 15 मिनिटांचा व्हिडीओ टाकला. या व्हिडीओमध्ये त्याची गर्लफ्रेंड व्हिडीओ गेम खेळत असल्याचे कळत आहे. नऊ महिन्यात डेनिसनं हा 2-डी गेम तयार केला आणि त्यानंतर गर्लफ्रेंडला सरप्राईज देत, तिला गेम खेळालया दिला. वाचा- 32 कोटींची लॉटरी लागल्यानंतर लाईव्ह कार्यक्रमातच पत्रकारानं दिला राजीनामा आणि…

वाचा- JCB, पाकचा चाहता ते पॅराग्लायडिंगवाला VIDEO; 2019मध्ये या ट्रेंडने जोरात हसवलं या व्हिडीओच्या अगदी शेवटी या गेममध्ये “तू माझ्याशी लग्न करशील?”, असा सवाल विचारण्यात आला. डेनिसच्या या मेहनतीची सर्वच दाद देत आहेत. तसेच, हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. वाचा- अरे आवरा! व्हायरल होतोय Jingle Bellsचा पुणेरी पॅटर्न, ढोल-ताशांवरचा VIDEO बघाच BMW आणि बंगल्याची किल्ली घेऊन केलं बॉयफ्रेंडला प्रपोज याआधी चायनामधल्या या मुलीनं आपल्या बॉयफ्रेंडच्या होकारासाठी चक्क महागडी गाडी भेट दिली. Xiaojing या 24 वर्षीय मुलीनं आपल्या प्रियकरासाठी एक अनोखे सरप्राईज दिले. त्यासाठी तिनं एक खोलीत फुलांची सजावट केली होती. त्याआधी ही तरुणी आपल्या प्रियकरासोबत मॉलमध्ये गेली आणि चक्क लग्नाचे कपडे तिनं त्याला भेट दिले. वाचा- VIDEO : होकारासाठी काय पण! BMW आणि बंगल्याची किल्ली घेऊन केलं बॉयफ्रेंडला प्रपोज

वाचा- VIDEO : शिकार करण्यासाठी वाघानं चिमुरड्यावर घातली झडप आणि… या दोघांची पहिली भेट ज्या मॉलमध्ये झाली तिथेच तिनं प्रियकराला प्रपोज करण्याचे ठरवले होते. यासाठी तिनं मित्रपरिवार आणि कुटुंबाची मदत घेतली होती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या