प्रतीकात्मक फोटो (सौजन्य - Canva)
वॉशिंग्टन, 03 फेब्रुवारी : अवाढव्य अजगरा ला टीव्हीवर किंवा व्हायरल व्हिडीओतच पाहून धडकी भरते. पण काही लोक असे आहेत, जे अशा अजगरांनाही पाळतात. अशाच एका पाळलेल्या अजगरासोबत एका तरुणाने जे केलं ते पाहून सर्वांना धक्का बसला आहे. एका महिलेसोबत या तरुणाचं भांडण झालं आणि या रागात त्याने विकृतीचा कळस गाठला. अजगरासोबत धक्कादायक कृत्य केलं आहे. अमेरिकेच्या फ्लोरिडातील हे प्रकरण आहे. केविन जस्टीन मेरोगा असं याच तरुणाचं नाव असल्याचं सांगितलं जातं आहे. 22 वर्षांचा केविन ज्याचं त्याच्याच फ्लॅटमध्ये राहणाऱ्या महिलेसोबत भांडण झालं. त्यानंतर त्याने तिला धक्का दिला आणि तो रूममध्ये घुसला आणि दरवाजा बंद केला. या महिलेसोबत त्याचं नातं काय आणि भांडणाचं कारण काय हे माहिती नाही. यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलीस जेव्हा तिथं पोहोचले तेव्हा केविन त्या बंद खोलीतच होता. हे वाचा - माणसाला जिवंत गिळताना दिसला अवाढव्य अजगर; VIDEO पाहूनच अंगाचं पाणी पाणी होईल पोलिसांनी त्याला बाहेर यायला सांगितलं. पण तो ऐकला नाही. अखेर पोलीस दरवाजा तोडून आत गेले. तेव्हा ते दृश्य दिसलं ते पाहून पोलीसही हादरले. पोलिसांना त्या खोलीत मृत अजगर सापडला. ज्याचं डोकं कापलेलं होतं.
हा त्या महिलेचा पाळलेला अजगर होता. महिलेने सांगितलं की केविनने तिच्या अजगराला दातांनी चावून त्याचे दोन तुकडे केले, त्याचं डोकं वेगळं केलं. दरम्यान पोलिसांनी केविनला अटक केली आहे. हे वाचा - जिवंत सापाला गळ्यात गुंडाळून अगदी स्टाईलमध्ये काढला Selfie; पण पुढच्याच क्षणी… 2021 मध्ये भारताच्या ओडिशातही असंच एक प्रकरण समोर आलं होतं. एका 45 व्यक्तीने साप चावून खाल्ला. त्या सापाचा मृत्यू झाला.