JOIN US
मराठी बातम्या / Viral / Male goat gives milk : कसं शक्य आहे? चक्क बकरे देतायेत दूध; विश्वास बसत नाही तर पाहा हा VIDEO

Male goat gives milk : कसं शक्य आहे? चक्क बकरे देतायेत दूध; विश्वास बसत नाही तर पाहा हा VIDEO

दूध देणाऱ्या या बकऱ्यांना पाहण्यासाठी दूरदूरहून लोक येत आहेत.

जाहिरात

दूध देणारे बकरे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

अंकुश मोरे/भोपाळ, 11 ऑक्टोबर : तुम्ही कधी बकऱ्याचं दूध प्यायलात का? हो… बकऱ्याचंच दूध… आमच्या लिहिण्यात किंवा तुमच्या वाचण्यात बिलकुल चूक झालेली नाही. किंवा आम्ही कोणती मस्करीही करत नाही आहोत. प्रत्यक्षात असे काही बकरे दूध देत आहेत. आता तुम्हाला आश्चर्य वाटेल की नर असून बकरा कसा काय दूध देईल? हे कसं शक्य आहे? आणि असा दूध देणारा असा बकरा आहे तरी कुठे? असे एक ना दोन किती तरी प्रश्न तुम्हाला पडले असतील. सध्या या दूध देणाऱ्या बकऱ्यांची चर्चा सर्वत्र होते आहे. मध्य प्रदेशच्या बुराहनपूर जिल्ह्यातील एका फार्म हाऊसमध्ये असे काही बकरे आहेत, जे पूर्णपणे नर प्रजातीतील आहे. नैसर्गिकरित्या त्यांची शारीरिक रचनाही नर बकऱ्यांसारखीच आहे. पण ते दूध देतात.  त्यांना प्रत्यक्षात पाहण्यासाठी दूर-दूरहून लोक येतात. हे वाचा -  Video: आरती सुरू झाली अन् बकरा देवासमोर नतमस्तक, पाहणारे भाविक झाले आश्चर्यचकीत माहितीनुसार सरताज फार्ममध्ये शंभरपेक्षा अधिक बकरे आहेत. त्यापैकी 3-4 बकरे असे आहेत जे दूध देतात. 15 वर्षांपासून बकरे पाळणारे फार्मचे मालक डॉ. तुषार यांनी सांगितलं की, या बकऱ्यांची शारीरिक रचना इतर बकऱ्यांसारखीच आहे. पण दूध देत असल्याने त्यांच्यात थोडे वेगळेपण आहे. जसजसं त्यांचं वय वाढलं तसतसं त्यांच्यातील हे वेगळपणं दिसून आलं हे बकरे दिवसभरात 250 मिलीलीटर दूध देतात. हे बकरे राजस्थानी प्रजातीचे आहेत. त्यांना चांगला आहार लागतो, असंही डॉ. तुषार यांनी सांगितलं. या बकऱ्यांना पाहून सामान्य नागरिक हैराण आहेतच. पण तज्ज्ञही यामागील कारण शोधत आहेत. तर स्थानिक डॉक्टरांच्या मते, काही प्रकरणात असं होतं. हे वाचा -  छोटं पिल्लू समजून सिंहाच्या छाव्याला गोंजारायला गेला तरुण; पुढे जे घडलं ते धक्कादायक; पाहा VIDEO पशु चिकित्सक डाॅक्टर अजय रघुवंशी म्हणाले, फक्त बकरेच नाही तर बैलासारखे इतर प्राणीही दूध देत असल्याची प्रकरणं ऐकायला मिळाली आहेत. शंभरपैकी एका बकऱ्यात असं पाहायला मिळतं. हार्मोनल बदलांमुळे असं होऊ शकतं. पण प्रत्येक वेळी एका विशिष्ट प्रजातीबाबतीतच घडेल असं नाही.

संबंधित बातम्या

डॉक्टरांनी यामागी कारण सांगितलं. तरी सर्वांसाठी ही आश्चर्यकारक आणि हैराण करणारी अशी बाब आहे. तुम्हाला याबाबत काय वाटतं ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन आम्हाला नक्की सांगा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या