JOIN US
मराठी बातम्या / Viral / ज्या वादळाला ती आपल्या कॅमेऱ्यात कैद करत होती ते घोंगावत तिच्याजवळच आलं आणि...; अंगावर काटा आणणारा LIVE VIDEO

ज्या वादळाला ती आपल्या कॅमेऱ्यात कैद करत होती ते घोंगावत तिच्याजवळच आलं आणि...; अंगावर काटा आणणारा LIVE VIDEO

चक्रीवादळाचा लाइव्ह करण्याच्या नादात महिलेने आपला जीव धोक्यात टाकला.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मलेशिया, 27 जानेवारी : आपल्यासमोर कोणती एखादी घडत असेल तर ती सर्वात आधी आपल्या कॅमेऱ्यात कैद करण्याची घाई असते. मग समोर दुसऱ्या कुणाचा तरी जीव जात असो किंवा आपल्यासमोरच मृत्यू उभा ठाकलेला असो सर्वात आधी त्या घटनेचा व्हिडीओ बनवण्यात बहुतेक लोक व्यस्त दिसतात. सध्या अशाच एक भयंकर घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ज्यात एक महिला चक्रीवादळाचा लाइव्ह व्हिडीओ शूट करत होती (Tornado live facebook video). त्यानंतर जे घडलं ते थरकाप उडवणारं आहे. मलेशियातील ही धक्कादायक घटना आहे. 26 जानेवारीला मलेशियात चक्रीवादळ आलं. त्यावेळी एक महिला या वादळाचं शूट करू लागली. आपला जीव वाचवण्यासाठी पळायचं सोडून ती वादळाला कॅमेऱ्याक कैद करू लागली. त्यानंतर ज्या वादळाला ती आपल्या कॅमेऱ्यात कैद करत होती, तेच वादळ अचानक तिच्याजवळ आलं आणि त्यानंतर जे घडलं ते पाहूनच अंगावर अक्षरशः काटा येतो. हे वाचा -  Oh No! सर्कशीत स्टंट करताना भयानक अपघात, Video पाहून येईल अंगावर काटा महिला वादळ आपल्या फेसबुक लाइव्हवर दाखवत होती. त्यावेळी तिच्याजवळ वादळ येताच जे काही घडलं ते सर्व फेसबुक लाईव्हमध्येच दिसलं. महिलेसोबत शेवटी जे घडलं त्याचा तिनेही विचार केला नसाला.

आकाशात चक्रीवादळ फिरताना दिसते आहे. हळूहळू हे वादळ जमिनीच्या दिशेनं येतं. हे वादळ आपल्या इतकं जवळ येईल याचा विचारही या महिलेने केला नव्हता आणि अचानक ते तिच्यासमोर आलं. त्यानंतर मात्र तिने आपला जीव वाचवण्यासाठी तिथून पळ काढला. महिला या व्हिडीओत पळतानाही दिसते आहे. एका सुरक्षित ठिकाणी ती जाते. पण तरी ती आपलं शूटिंग काही थांबवत नाही. हे वाचा -  तरुणांनाही लाजवेल असा आजीआजोबांचा VIDEO; या वयस्कर कपलला पाहून नेटिझन्स हैराण त्यानंतर चक्रिवादळाने काय थैमान घातलं ते तर तुम्ही या व्हिडीओत पाहूच शकता.  या महिलेचं नशीब बलवत्तर म्हणून तचा जीव वाचला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या