JOIN US
मराठी बातम्या / Viral / VIDEO - ब्रिटनच्या हाय कमिशनरचा 'मराठी बाणा'; मुंबईच्या रस्त्यावर भन्नाट अंदाजात दिल्या Makar Sankranti च्या शुभेच्छा

VIDEO - ब्रिटनच्या हाय कमिशनरचा 'मराठी बाणा'; मुंबईच्या रस्त्यावर भन्नाट अंदाजात दिल्या Makar Sankranti च्या शुभेच्छा

भारतातील ब्रिटिश हाय कमिश्नर ॲलेक्सही यांनी मराठमोळ्या अंदाजात मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

जाहिरात

ब्रिटिश हाय कमिशनरकडून मकर संक्रांतीच्या शुभेच्छा

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 14 जानेवारी : आता काही वेळातच मकर संक्रांती च्या शुभेच्छांचा सर्वांवर वर्षावर होईल. जो तो प्रत्यक्ष भेटून किंवा सोशल मीडियावर एकमेकांना मकर संक्रांतींच्या शुभेच्छा देईल. यामध्ये ब्रिटिश हाय कमिश्नर ॲलेक्सही मागे राहिले नाहीत. त्यांनीही मराठमोळ्या अंदाजात मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मुंबईच्या रस्त्यावर उभं राहून त्यांनी खास अंदाजात या शुभेच्छा दिल्या आहेत. ज्यात त्यांनी आपला मराठी बाणा दाखवला आहे. ब्रिटिश हाय कमिश्नर ॲलेक्स एलिस मुंबईत आहेत. मुंबईत ते प्रत्येक गोष्ट एन्जॉय करत आहेत. अगदी मुंबईच्या स्ट्रिट फूडची त्यांनी चव चाखली. रस्त्यावर उभं राहून सॅंडविच आणि मिरची खाताना ते दिसले. आता त्यांनी याच रस्त्यावर उभं राहत हटके स्टाईलने संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्या ट्विटर अकाऊंटवर त्यांनी हा व्हिडीओही पोस्ट केला आहे. हे वाचा -  मुंबईच्या रस्त्यावर उभं राहून खाल्लं सँडविच; फडणवीसांची भेट घेताच कुठे गेले ब्रिटनचे हाय कमिश्नर? व्हिडीओत तुम्ही पाहू शकता ते एका रेल्वे स्टेशनजवळ उभे आहेत. त्यांनी या व्हिडीओत आपल्याला भारतीय संस्कृती, सण किती आवडतात ते सांगितलं आहे. तसंच संक्रांतीला जे तिळगूळ आपण देतो ते खात त्यांनी तिळगूळ घ्या आणि गोड गोड बोला, अशा मराठीत शुभेच्छा दिल्या आहेत.

संबंधित बातम्या

तुम्हाला ब्रिटिश एलिस यांच्या या मराठमोळ्या शुभेच्छा कशा वाटल्या ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. हे वाचा -  Makarsankranti Wishes : तीळगुळ घ्या, गोड गोड बोला! मकरसंक्रांतीनिमित्त WhatsAppला ठेवा हे सुंदर शुभेच्छा संदेश दरम्यान एलिस यांनी 2021 मध्येही मुंबईच्या वडापाववर ताव मारला होता. याचे फोटो आणि व्हिडीओही त्यांनी शेअऱ केले होते. त्यावेळी लय भारी असं कॅप्शन देत त्यांनी नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या