JOIN US
मराठी बातम्या / Viral / खिशाला पेट्रोल परवडेना; औरंगाबादचा तरुण थेट घोडेस्वारी करत पोहोचला कॉलेजला, भन्नाट VIDEO

खिशाला पेट्रोल परवडेना; औरंगाबादचा तरुण थेट घोडेस्वारी करत पोहोचला कॉलेजला, भन्नाट VIDEO

गेल्या काही दिवसात पेट्रोल आणि डिझेलचे(Petrol Diesel Price Hike) दर आकाशाला भिडले आहे. अशातच औरंगाबादचा एक तरुण चांगलाच चर्चेत आला आहे. खिशाला पेट्रोल परवडेना म्हणून तो प्रवासासाठी घोडा वापरत असल्याची माहिती समोर आली आहे.

जाहिरात

maharashtra man starts horse riding in aurangabad due hike in petrol prices

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 15 मार्च: पेट्रोल डिझेलचे (Petrol Diesel Prices) भाव गगनाला भिडले की सर्वसामान्यांना याचा मोठा फटका बसत असतो. त्यामुळे सर्वसामान्यांचे अर्थिकचक्र बिघडले आहे. अनेकजण जोड उद्योग करुन पोटाची खळगी भरत आहेत. महागाईचा फटका बसलेल्यांच्या अनेक गोष्टी समोर येत असतात. अशातच औरंगाबादचा एक तरुण चांगलाच चर्चेत आला आहे. खिशाला पेट्रोल परवडेना म्हणून तो प्रवासासाठी घोडा वापरत असल्याची माहिती समोर आली आहे. या तरुणाचे शेख युसूफ असे आहे. तो औरंगाबाद शहरातील असून पेट्रोलचे वाढते दर परवडत नसल्याने कामावर जाण्यासाठी त्याने घोडा खरेदी केला. “मी कॉलेजमध्ये लॅब असिस्टंट म्हणून काम करतो आणि आजही मी प्रवासासाठी माझा घोडा वापरतो.यामुळे मी तंदुरुस्त आणि निरोगी असतो” त्यांच्या म्हणण्यानुसार, इंधनाच्या वाढत्या किमती पाहता, वाहतुकीचे साधन म्हणून घोडा हा उत्तम पर्याय आहे. असे शेख युसूफने एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. तसेच, गेल्या सहा महिन्यापासून त्यांच्याकडे हा घोडा असून, ज्यामुळे पेट्रोलला लागणारा खर्च निम्म्याहून कमी झाला असल्याचं शेख युसूफ म्हणाले. घोड्याला दिवसभरात 50 रुपयांचा खर्च येतो, ज्यामुळे दिवसभर शहरात कुठेही जाता येते. त्यामुळे दुचाकीच्या तुलनेत घोडा कधीही परवडतो, असंही युसूफ म्हणाले.

संबंधित बातम्या

शेख युसूफ हे औरंगाबाद येथील रहिवासी असून ते आपल्या ‘जिगर’ या घोड्यावर बसून कामाला जातात. आजच्या या काळात पेट्रोल डिझेल महागले तरी लोक दुचाकी, चारचाकी चालविणे सोडत नाही. अशात शेख युसूफ हे आजच्या तरुणाईला प्रेरित करतात. देशातील तीन ऑईल मार्केटिंग कंपन्या HPCL, BPCL आणि IOCL रोज सकाळी 6 वाजता पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर करतात. पेट्रोल-डिझेल दरात एक्साइज ड्यूटी, डिलर कमीशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर याचा किंमत दुप्पट होते. पाच राज्यातील निवडणुका संपल्यानंतर आता अनेक महिन्यांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होण्याची वाट पाहणाऱ्या कंपन्या येत्या काही दिवसांत प्रतिलीटर 6 रुपयांनी दर वाढवू (Petrol Diesel Price Hike) शकतात, असा अंदाज आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या