JOIN US
मराठी बातम्या / Viral / VIDEO : खरं प्रेम! घर सोडून परदेशात गेला मालक, 3 वर्ष अंगणात बसून वाट पाहतोय त्यांचा श्वान

VIDEO : खरं प्रेम! घर सोडून परदेशात गेला मालक, 3 वर्ष अंगणात बसून वाट पाहतोय त्यांचा श्वान

मन हेलावून टाकणारा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

बीजिंग, 01 मे : प्रेम ही एक अशी भावना आहे, जी कोणत्याही नियमात बसत नाही. माणसापेक्षा प्राणीच जास्त जीव लावतात, हे खरं आहे. याचा प्रत्यय सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओतून आला. चीनमधल्या एका श्वानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये हा श्वान गेल्या 3 वर्षांपासून आपल्या मालकांच्या घरी परत येण्याची वाट पाहत आहे. या श्वानाचे नाव हीझी आहे. खरतर हा श्वान ज्या कुटुंबासोबत राहत होता तो आता दक्षिण कोरियामध्ये स्थायिक झाले आहेत. या कुटुंबाने आपल्या श्वानालासोबत नेले नाही. त्यामुळं त्या दिवसापासून तो आपल्या मालकाच्या परत येण्याची वाट पाहत आहे. या श्वानाची निष्ठा पाहून आजूबाजूच्या लोकांनी त्याची काळजी घ्यायला सुरुवात केली आहे. चीनच्या झियान शहरात राहणारे एक कुटुंब सन 2017मध्ये दक्षिण कोरियामध्ये गेले परंतु त्यांनी या श्वानाला इथेच सोडलं. मात्र मालक जाऊन वर्षे झाल्यानंतरही हा श्वान घराबाहेर त्यांच्या येण्याची वाट पाहत आहे. पूर्वी, स्थानिक अधिकाऱ्यांनी या श्वानाला घेऊन जाण्याचा प्रयत्न केला आणि संपूर्ण प्रकरण समोर आले. वाचा- VIDEO : महिलेच्या कानात घुसला कोळी, काही दिवसांनंतर अशी झाली होती अवस्था वाचा- VIDEO : काय म्हणावं याला! लॉकडाऊनमध्येच घरासमोर उघडला Social Distancing बार शेजारी घेतात काळजी चीनमध्ये कोरोना उद्रेक झाल्यानंतर सरकारनं भटक्या श्वानांकडे विशेष लक्ष देत आहे. त्यामुळं काही अधिकाऱ्यांनी हीझीला घेऊन जाण्याचा प्रयत्न केला मात्र लोकांच्या विरोधानंतर त्यांना माघारी जावे लागले. हेझीची काळजी घेत असलेल्या वांग यांनी डेली मेलला सांगितले की, काही लोक एकत्र हेजीची काळजी घेतात, त्याला मांस आणि खाऊ देतात. हेझीला वाचवण्यासाठी एका स्थानिक मुलीने व्हिडिओ न्यूज प्लॅटफॉर्म पियरद्वारे अपीलही केले आहे. वाचा- शीखांनी लाखो लोकांना केली मदत, तर अमेरिकन पोलिसांनी असे मानले आभार

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या