JOIN US
मराठी बातम्या / Viral / OMG! विमानावर कोसळली वीज आणि... अंगावर काटा आणणारा VIDEO

OMG! विमानावर कोसळली वीज आणि... अंगावर काटा आणणारा VIDEO

विजेने (lighting) तिन्ही बाजूने विमानाला (plane) घेरलं.

जाहिरात

फोटो - SWNS

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

लंडन, 10 जून : आकाशात वीज (lightning) पाहिली तरी आपला थरकाप उडतो, अशाच आकाशात असलेल्या या विमानावर वीज कोसळताना हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. लंडनमध्ये (London) एका विमानावर (Plane) वीज कोसळतानाची दृश्यं कॅमेऱ्यात कैद झालीत. डेली मेल च्या वृत्तानुसार, विमान हिथ्रो विमानतळावर (Heathrow Airport) लँड होण्याच्या तयारीत होतं आणि त्याचवेळी तीन बोल्ट वीज या विमानावर (Plane Hit By 3 Lightning Bolts) कोसळली. ही दृश्यं कॅमेऱ्यात टिपली गेली आणि व्हिडीओ व्हायरल होऊ लागला. हा व्हिडिओ तुम्ही नीट पाहाल, तर ढगातून तीन दिशेनं तीन वेगवेगळ्या विजा येतात आणि या विमानावर धडकतात. जणू या विजांनी सर्व बाजूंनी या विमानाला हेरलं आणि त्याच्यावर आक्रमणच केलं. विमानावर विजांनी हल्ला करताच ढगांचा इतका मोठा गडगडाट होतो की तो आवाज ऐकूनच धडकी भरते. खरं तर ही दृश्यं टिपताना ती टिपणाऱ्याला प्रत्यक्षदर्शीलाही त्यावेळी वीज विमानावर कोसळल्याचं समजलं नाही. तो म्हणाला, “आकाशातील हे दृश्यं टिपण्यासाठी मी माझा कॅमेरा काढला आणि क्लिक केला. जेव्हा मी हा व्हिडिओ माझ्या कॅमेऱ्यात पुन्हा पाहिला, तेव्हा पाहतो तर का? विमानावर वीज कोसळली. ही वीज इतकी मोठी होती की कदाचित ती जमिनीवरही कोसळली. सुदैवानं कुणाला काही झालं नसावं अशी आशा मी करतो” विमानावर वीज कोसळल्यानंतर काय होतं? या विमानाला कोणतीही हानी पोहोचली नसावी. कारण तज्ज्ञांच्या माहितीनुसार, प्रवासी विमानांंना विजेपासून संरक्षण देणारं असं कवच असतं. त्यामुळे विमानांवर वीज कोसळली तरी विमानाच्या आत त्याचा परिणाम होत नाही. विमानातील प्रवाशांना विजेचा प्रकाश दिसतो मात्र दुसरं काहीच जाणवत नाही. संकलन, संपादन - प्रिया लाड हे वाचा  दुडूदुडू धावणाऱ्या गोंडस मुलाचा हा VIDEO नीट पाहा, काळजाचा चुकेल ठोका इंग्लिश स्पीकिंग क्लासचे भन्नाट पोस्टर वाचून आवरणार नाही हसू, PHOTOS VIRAL

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या