JOIN US
मराठी बातम्या / Viral / मोठ झाल्यावर इंजिनिअर का व्हायचंय? चिमुकल्याने दिलेलं उत्तर ऐकून पोट धरून हसाल, VIDEO

मोठ झाल्यावर इंजिनिअर का व्हायचंय? चिमुकल्याने दिलेलं उत्तर ऐकून पोट धरून हसाल, VIDEO

एक चिमुकला मोठं होऊन आपल्याला इंजिनिअर (Engineer) व्हायचं असल्याचं सांगतो. मात्र, त्याला इंजिनिअर होण्याची इच्छा का आहे, याचं तो अतिशय मजेशीर कारण सांगतो.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली 07 जानेवारी : लहान असताना मुलं हीच स्वप्न बघतात की मोठं झाल्यावर आपल्याला काय व्हायचं आहे. जे काम करण्यात त्यांना मजा येते, तेच करायला त्यांना आवडतं. इतकंच नाही तर अनेकदा आपल्या पालकांनाही ते हे सांगतात की मोठं होऊन त्यांना काय बनायचं आहे. सध्या अशाच एका मुलाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल (Funny Viral Video of Little Boy) झाला आहे. यात एक चिमुकला मोठं होऊन आपल्याला इंजिनिअर (Engineer) व्हायचं असल्याचं सांगतो. मात्र, त्याला इंजिनिअर होण्याची इच्छा का आहे, याचं तो अतिशय मजेशीर कारण सांगतो. VIDEO - मैत्रिणीने अचानक सर्वांसमोरच दिलं गिफ्ट; नवरीबाईच नाही तर नवरदेवही लाजला या चिमुकल्याने इंजिनिअरबद्दल हा विचार का केला किंवा त्याला हे सगळं कोणी सांगितलं, हे माहिती नाही. मात्र, त्याचं उत्तर ऐकून सगळेच थक्क झाले. या व्हिडिओमध्ये दिसतं की एका मुलाला त्याची आई अभ्यास शिकवत आहे. इतक्यात तो काहीतरी कारणाने रडू लागतो. ही महिला अभ्यास करण्यासाठी त्याच्यावर दबाव टाकते, मात्र हा मुलगा रडत रडत सांगतो की शाळेतही अर्धा तास अभ्यास करावा लागतो.

संबंधित बातम्या

मुलगा अभ्यास करत नसल्याने त्याची आई त्याला सांगते, की अभ्यास केला तरच डॉक्टर बनशील. हे ऐकून हा मुलगा आणखीच रडू लागतो. तो पुढे सांगतो की मला इंजिनिअर बनायचं आहे. कारण इंजिनिअर अभ्यास करत नाहीत. चिमुकल्याचं हे उत्तर ऐकून कोणालाही हसू येईल. हा मजेशीर व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. OMG! अस्वलाच्या मांडीवर बसून मस्ती करू लागली तरुणी; पाहा पुढे काय घडलं, VIDEO मुलाचा हा रडतानाचा व्हिडिओ लोकांच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे. हा व्हिडिओ पाहून लोक इंजिनिअर्सची थट्टा करत आहेत. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर काहींनी यावर कमेंट करत म्हटलं, की तुम्ही मुलांना असं का शिकवता? इंजिनिअर होण्यासाठीही अभ्यास करावा लागतो. हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर मीमवालान्यूज नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या