JOIN US
मराठी बातम्या / Viral / आईसोबत नदी पार करताना पाण्यात बुडला बछडा, पुढे काय झालं पाहा VIDEO

आईसोबत नदी पार करताना पाण्यात बुडला बछडा, पुढे काय झालं पाहा VIDEO

सिंहिणीने आपल्यासोबत तीन छाव्यांना घेऊन नदी पार केली आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 16 मार्च : लहान मुलांना नदी ओलांडताना आईला विशेष काळजी घ्यावी लागते. पाण्याची वाटणारी भीती आणि त्यातून त्यांना मिळणारा धडा फार मोठा असतो. सिंहिणीने आपल्यासोबत तीन छाव्यांना घेऊन नदी पार केली आहे. या छाव्यांचा नदी पार करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये पहिल्या बछड्याला नदी पार करता येत नाही तो मध्येच अडखळतो आणि बुडायला लागतो. त्यावेळी या छाव्यानं कसं स्वत:ला सावरत नदी पार केली आहे याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. IFS ऑफिसर प्रविण कासवान यांनी हा व्हिडीओ आपल्या ट्विटर हँडलवर रविवारी अलोड केला होता. सिंहीण आपल्या छाव्यांना कशी नदी पार करायला शिकवते असं कॅप्शन देऊन हा व्हिडीओ ट्वीट करण्यात आला होता. हा व्हिडीओ गीरमधील असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

हे वाचा- कोल्हापूरच्या पन्हाळा रोडवर चक्रीवादळामुळे पेट्रोल पंपच उखडला, VIDEO व्हायरल या व्हिडीओला सोशल मीडियावर तुफान लाईक्स मिळाले आहेत. 7 हजारहून अधिक लोकांनी लाईक केलं तर एक हजारहून अधिक लोकांनी रिट्वीट केलं आहे.

जाहिरात

एका युझरने म्हटलं आहे की आई हा सर्वात पहिला गुरु असते. त्यामुळे ती आपल्याला प्रत्येक छोट्या गोष्टीतून काहीतरी शिकवत असते. या पिल्लाही बुडायचं नाही आणि नदी कशी ओलांडायची याचे धडे देत आहे. तर दुसरा युझर म्हणतो की आईचं प्रेम आणि काळजी या व्हिडीओमध्ये दिसत आहे. या व्हिडीओला सोशल मीडियावर तुफान कमेंट्स आल्या आहेत. तर बुडत्या छाव्यानं स्वत:ला सावरत नदी पार केल्यानं युझर्सनी त्यांचं कौतुक केलं आहे. हे वाचा- VIDEO : ‘कित्थों आया कोरोना’, कोरोना व्हायरसवरचं हे भजन तुम्ही ऐकलं का?

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या