JOIN US
मराठी बातम्या / Viral / VIDEO : वाघाच्या ‘आरे’ला सिंहाने केले ‘कारे’, पाहा भांडणात कोणी मारली बाजी

VIDEO : वाघाच्या ‘आरे’ला सिंहाने केले ‘कारे’, पाहा भांडणात कोणी मारली बाजी

फार क्वचितच वाघ आणि सिंह एकमेकांसमोर येतात. असाच एक वाघ-सिंहाच्या भांडणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

सिंहाला जंगलाचा राजा म्हणतात, मात्र वाघाचेही जंगलात तेवढेच वर्चस्व असते. वाघ आणि सिंह यांची जंगलात आपली अशी एक दहशत असते. त्यामुळं फार क्वचितच वाघ आणि सिंह एकमेकांसमोर येतात. असाच एक वाघ-सिंहाच्या भांडणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. वाघ-सिंह यांच्यातील चकमकीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे, जो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 24 सेकंदांची ही क्लिप रविवारी भारतीय वनसेवा अधिकारी सुशांत नंदा यांनी ट्विटरवर शेअर केली. या व्हिडीओमध्ये सिंह जंगलात आरामात बसलेला दिसत आहे. त्यातच वाघ आणि सिंह एकमेकांसमोर आले आणि तेवढ्यात वाघानं सिंहावर हल्ला केला. वाघाने सिंहाकडे पाहिले आणि गळ्याचा चावा घेतला. त्यानंतर सिंहाने पलटी मारून वाघाला पंजाने मारायला सुरुवात केली. वाचा- VIDEO : शिकार करण्यासाठी वाघानं चिमुरड्यावर घातली झडप आणि… हा व्हिडिओ पोस्ट करताना सुशांत नंदाने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “जेव्हा पंजा मारण्याची वेळ येते तेव्हा सिंह बॉक्सरप्रमाणे वागतो. सिंहाच्या पंजानं एखाद्या गायीचे मुंडकेही वेगळे होऊ शकते. पाहा हा स्लो मोशन व्हिडिओ… ’’ वाचा- अरे देवा! मांजरीला मारण्यासाठी झाडावर चढला श्वान आणि…

संबंधित बातम्या

वाचा- हाऊज द जोश! आर्मी ऑफिसरला पाहताच श्वानानं ठोकला सलाम, PHOTO VIRAL नंदा यांनी 29 डिसेंबर रोजी हा व्हिडिओ अपलोड केला होता. या व्हिडीओ 14 हजारहून अधिक लोकांनी पाहिला आहे तर 600 हून अधिक लोकांनी लाईक तर 150 हून अधिक री-ट्वीट आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या