JOIN US
मराठी बातम्या / Viral / VIDEO - शिकारीला आलेला बिबट्याही फक्त पाहतच राहिला; शेवटच्या क्षणी मांजरीने खेळली आपली जबरदस्त 'चाल'

VIDEO - शिकारीला आलेला बिबट्याही फक्त पाहतच राहिला; शेवटच्या क्षणी मांजरीने खेळली आपली जबरदस्त 'चाल'

मांजराची शिकार आलेल्या या बिबट्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होतो आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 17 जून : बिबट्याची ताकद, त्याच वेग, त्याची क्षमता आणि शिकार करण्याची पद्धत तुम्हाला माहितीच असेल. बिबट्याचे शिकारीचे असे बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. भलेभले प्राणीही बिबट्याच्या तावडीत सापडले की त्यांची सुटका अशक्यच. पण एका साध्या मांजराने मात्र या खतरनाक बिबट्यालाही चांगलाच धडा शिकवला आहे. बिबट्या आणि मांजराचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे (Leopard cat video). अनेकदा इकडं आड आणि तिकडे विहीर अशी परिस्थिती निर्माण होते. म्हणजे दोन्ही बाजूंनी संकट येतात किंवा दोन्ही मार्ग बंद होतात अशावेळी नेमकं काय करावं ते समजत नाही. पण एका साध्या मांजरीनेही अशा परिस्थितीतून मार्ग काढला आहे. बिबट्यापासून तिने आपला जीव वाचवला आहे.  झाडावर बसलेल्या एका मांजरीची शिकार करण्याची बिबट्या आला. पण शेवटच्या क्षणी मांजरीने अशी चाल खेळली की बिबट्याही तिच्याकडे पाहत राहिला (Leopard attack on cat video). हे वाचा -  Shocking Video - जंगलातून रस्त्यावर येताच सायकलस्वाराला धडकला बिबट्या; पुढे जे घडलं ते थरकाप उडवणारं व्हिडीओत पाहू शकता एक झुकलेलं झाड दिसतं आहे. झाडाच्या उंच टोकावर एक मांजर आहे आणि एक बिबट्या झाडावर चढताना दिसत आहे. हा बिबट्या मांजरीची शिकार करायला आला आहे. अगदी शांत, सावधपणे हळूहळू तो झाडावर चढला. मांजर पळून जाणार नाही याची पुरेपूर खबरदारी त्याने घेतली. मांजरीच्या जवळ तो पोहोचला. मांजरीवर झडप घालणार तोच मांजरीने झाडावरून लांब उडी मारली आणि तिथून पळून गेली. बिबट्या मात्र काहीच करू शकला नाही. शिकार आपल्याला मिळणारच या आत्मविश्वासाने झाडावर चढलेला बिबट्या पाहत राहिला.

हा व्हिडीओ बोत्सवानाच्या माशातू गेम रिझर्व्हमधील आहे. इथं गेलेला 32 वर्षांचा टुरिस्ट गाइड रॉजर बोरेनने आपल्या कॅमेऱ्यात हे दृष्य कैद केलं. रोजरने दिलेल्या माहितीनुसार सुरुवातीला दोन बिबट्या त्याला आपसात खेळताना दिसले. त्यानंतर एक बिबट्या एका झाडाच्या दिशेने गेला. कारण त्या झाडावर त्याला मांजर दिसली. त्यानंतर रोजरही बिबट्याच्या मागोमाग केला आणि तिथं जे काही घडलं ते आपल्या कॅमेऱ्यात कैद केलं. हे वाचा -  उफ्फ! चक्क एका माकडीणीवर फिदा झाले नेटिझन्स; VIDEO पाहाल तर तुम्हालाही समजेल नेमकं कारण मांजरीत बिबट्याइतकी ताकद नाही. पण शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ म्हणतात ना, त्याचाच प्रत्यय या व्हिडीओतून येतो. मांजरीला वाघाची मावशी म्हणतात ते काही चुकीचं नाही हेसुद्धा या व्हिडीओतून दिसून येतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या