प्रतिकात्मक फोटो
मुंबई 18 सप्टेंबर : आपल्या आजूबाजूला अशा अनेक गोष्टी आहेत, ज्यांना आपण दररोज पाहातो. परंतू आपण त्याच्याबाबत जास्त विचार करत नाही. त्यांपैकीच एक आहे ते म्हणजे कारखान्यांच्या छतावर फिरणारा पंखा. खेडेगावात किंवा शहरात तुम्ही एखाद्या दुकानाला किंवा कारखान्याला पाहिलात तर तुम्हाला त्याच्यावर स्टीलचा एक मोठा क्रेट किंवा पंखा दिसेल. परंतू हा पंखा नक्की काय काम करतो तुम्हाला माहितीय? चला या पंख्याबद्दल जाणून घेऊ. वास्तविक, कारखान्यांच्या छतावर गोल गोल फिरणाऱ्या या स्टीलच्या क्रेटसारख्या वस्तूला टर्बो व्हेंटिलेटर म्हणतात. हे इतर अनेक नावांनी ओळखले जाते. त्याबद्दलच्या काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेऊया. खरंतर या पंख्याला टर्बो व्हेंटिलेटर तसेच इतर अनेक नावांनी ओळखली जाते. या टर्बो व्हेंटिलेटरला रूफ टॉप एअर व्हेंटिलेटर, टर्बाइन व्हेंटिलेटर, रूफ एक्स्ट्रॅक्टर आणि रूफ टॉप व्हेंटिलेटर म्हणून देखील ओळखलं जातं. हे वाचा : खात्यात चुकून आले 11 हजार कोटी, ना बँकेत गेला ना पैसे काढले… खेळला असा गेम, पाहून सगळेच हैराण तसे पाहाता कारखान्यांव्यतिरिक्त टॉप व्हेंटिलेटर गोदाम, स्टोअर्स, रेल्वे स्टेशन आणि इतर आवारांच्या छतावर देखील आपल्याला पाहायला मिळतात. याआधी हे छतावर फक्त कारखान्यांच्या छतावरच दिसत होते पण त्यांचे कार्य आणि कार्यक्षमतेचा विचार करता ते इतर अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वापरले जात आहेत. टर्बो व्हेंटिलेटर किंवा रूफ टॉप व्हेंटिलेटरचे काम काय आहे? टर्बो व्हेंटिलेटर किंवा रूफ टॉप व्हेंटिलेटर हे हळू-हलणारे पंखे आहेत जे कारखान्यांमधील गरम हवा काढून टाकण्याचे काम करतात. विज्ञानाला लक्षात घेता, गरम हवा ही नेहमी हलकी असते, ज्यामुळे ती वर येते. अशा परिस्थितीत, ही गरम हवा तेथून बाहेर काढणे खूप कठीण आहे. हेच कारण आहे की, अशा कारखान्यांच्या छतावर किंवा इतर आवारात रूप टॉप व्हेंटिलेटर बसवले आहेत जेणेकरुन ते छताद्वारे कोणत्याही आवारात असलेली गरम हवा सहज काढू शकतील आणि तेथील जागा थंड देखील राहिल. हे वाचा : अगदी 10 सेंकदात उघडेल तुमच्या व्यक्तिमत्त्वाचं रहस्य, फक्त ‘या’ कोड्याचं उत्तर द्या टर्बाइन व्हेंटिलेटर अर्थातच मंद असतात, ते आपल्या घरातील पंख्यांसारखे फास्ट चालत नाहीत. परंतु ते गरम हवा बाहेर काढण्यासाठी सर्वात उत्कृष्ट मार्गाने कार्य करतात. कोणत्याही आवारातून गरम हवा बाहेर आली की खिडक्या आणि दारांतून येणारी ताजी हवा बराच काळ आवारात राहते. आम्ही तुम्हाला सांगतो की हे टर्बाइन व्हेंटिलेटर गरम हवा बाहेर काढण्यासाठी तसेच कारखाना किंवा परिसरात असलेली दुर्गंधी बाहेर काढण्यात मोठी भूमिका बजावते. याशिवाय, पावसाळ्यात या आवारातील ओलावा बाहेर काढण्याचे काम करते.