सोर्स : गुगल
मुंबई 05 नोव्हेंबर : बिस्किट हा पदार्थ लोक नेहमीच खातात , काही लोकांना तर चहासोबत बिस्किट लागतंच. तसे पाहाता हा अगदी ५ रुपयांपासून ते ५०, १०० रुपयांच्या लहान पुड्यापर्यंत ते बाजारात उपलब्ध आहेत. लोक आपल्या चवी प्रमाणे खारट, मसालेदार, गोड, कमी गोड अशी बिस्किटं खाणं पसंद करतात. शक्यतो सगळेच लोक बिस्किट खातात. पण तुम्हाला माहितीय का की जगात एक असं बिस्किट आहे, ज्याला खाण्याची तुमची कितीही इच्छा असली तरी देखील तुम्ही खाऊ शकत नाही. आता असं म्हटल्यानंतर तुमच्या मनात अस प्रश्न तर नक्की उभा राहिल की का? असं का? असं काय आहे की आम्ही ते खाऊ शकणार नाही. तर या मागे २ कारणं आहेत. हे ही वाचा : ‘हा’ आहे YouTube वर सर्वात जास्त पाहिला गेलेला व्हिडीओ, नाव ऐकून विश्वास बसणार नाही एक याची किंमत आणि दुसरं म्हणजे त्यामागचं ऐतिहासिक कारण, आता हे जाणून घेण्यासाठी त्याच्या इतिहासात डोकवावं लागेल. माहितीनुसार, शनिवारी या बिस्किटाचा लिलाव करण्यात आला. इंग्लंडमध्ये बिस्किटांचा लिलाव करणारे अँड्र्यू एल्ड्रीज म्हणतात की, हे आतापर्यंत विकले गेलेले सर्वात महागडे बिस्किट आहे. स्पीलर्स अँड बेकर्स कंपनीचा पायलट डिफेन्स बिस्किट हा बोटीच्या सर्व्हायव्हल किटमध्ये सापडला होता. हे बिस्किट टायटॅनिक काळातील आहे. हे जहाजात सापडलेले एकमेव बिस्किट होते. जे एका प्रवाशाने लाइफबोटीवर सुरक्षितपणे ठेवले होते. या घटनेनंतर ते बिस्किट एक आठवण म्हणून जतन करून वॉटरप्रूफ लिफाफ्यात ठेवण्यात आले. या चौकोनी डिझाइनमध्ये बनवलेल्या बिस्किटाची लांबी सुमारे नऊ ते १० सेंटीमीटर असते. अँड्र्यू म्हणतात की, हे ग्रीसमधील एका खरेदीदाराने विकत घेतले होते. इतकंच नाही तर अँड्र्यूचं असंही म्हणणं आहे की, जेव्हा टायटॅनिक जहाज बुडालं होतं. त्यावेळी समुद्रात मदत आणि बचावकार्य करण्यात आले. याच काळात फेनविक आणि त्याची बायको मॅबेल न्यूयॉर्कहून कारपाथिया जहाजावर हनिमूनसाठी निघाले. अशा परिस्थितीत त्याचे जहाजही या बचावकार्यात सहभागी झाले होते. तेव्हाच त्यांना हे बिस्कीट मिळालं. अँड्र्यू म्हणतो की, टायटॅनिक अपघाताशी संबंधित इतरही अनेक गोष्टी त्याच्याकडे आहेत. ज्याचा अनेक वर्षांपासून लिलाव होत आहे, पण या बिस्किटाएवढी महागडी काहीही विक्री झालेली नाही.
लोक या बिस्किटाला जतन करुन ठेवत आहेत, याच कारणामुळे हे बिस्किट कोणीही खात नाही किंवा खाऊ शकत नाही.