कानपूर, 16 ऑगस्ट : उत्तर प्रदेशातील कानपूरच्या रस्त्यावर सर्रास गाड्या घेऊन स्टंटबाजी करताना तरुण दिसतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एका लाल रंगाची फेरारी घेऊन स्टंटबाजी करताना एक तरुण दिसत आहे. या तरुणामुळे काही काळ पोलिसांना वाहतुकही थांबवावी लागली. स्वातंत्र्यदिनानिमित्त शहरातील पैशेवालांच्या मुलांनी फेरारी आणि अनेक परदेशी वाहनांसह गंगा बॅरेजवर स्टंट केले. यावेळी प्रचंड जाम झाला. काही लोकांना तर येथे सिनेमाचे शुटिंग सुरू आहे की काय, असा भास झाला. मुख्य म्हणजे या व्हिडीओमध्ये फेरारी गाडीनं स्टंट करत असातान पोलिसही हजर होते, पण यांना रोखण्याचे धैर्य त्यांना जमले नाही. या स्टंटचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यानंतर एसएसपीची दखल घेत नवाबगंज पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी त्वरित तक्रार दाखल केली आणि कार मालक शरद खेमका याला अटक केली. शरद खेमका कानपूरच्या गुटखा कंपनीचा मालक आहे. वाचा- शार्कच्या जबडयात होता पत्नीचा पाय, नवऱ्यानं पाण्यात मारली उडी आणि…; पाहा VIDEO
वाचा- …आणि डोळ्यांदेखत कोसळली वीज, कॅमेऱ्यात कैद झाला अंगावर शहारे आणणारा VIDEO एवढेच नाही तर पोलिसांनी ही फेरारी कारही ताब्यात घेतली आहे. सीओ अजितसिंग चौहान म्हणाले की, आरोपी तरुणांवर रस्त्यावर स्टंटबाजी करून, इतरांचे जीव धोक्यात घालणे, रस्ता रोखणे आणि महामारी कायद्यानुसार गुन्हा दाखल करून कारवाई केली जात आहे.