Five Men Fell In The Sewer Video: जर तुम्ही मित्रांसोबत बोलत असाल आणि बातचीत करीत असताना अचानक पायाखालची जमीन सरकली तर? अशीच काहीशी घटना राजस्थानमधील जैसलमेरमधून समोर आली आहे. येथे काही मित्र बातचीत करीत होते आणि अचानक ते सर्वजण खड्ड्यात पडले. या घटनेचा एक व्हिडीओदेखील व्हायरल झाला आहे. यात तुम्ही पाहू शकता की, 4 तरुण पंक्चरच्या दुकानात उभे राहून बोलत होते. दरम्यान एक मॅकेनिक दुचाकीची दुरुस्ती करीत होता. अचानक नाल्यावरील सिमेंटच्या स्लॅब तुटला आणि सर्व खाली गेले. हे ही वाचा- Ropeway Accident: हात सुटला अन् हेलिकॉप्टरमधून कोसळला तरुण, थरकाप उडवणारा LIVE VIDEO पंक्चरच्या दुकानातील 5 जणं गेले थेट नाल्यात… या अपघाताचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Social Media) होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जैसलमेर रेल्वे स्टेशनच्या पुढील मुख्य रस्त्यावर एक टायर पंक्चरचं दुकान आहे. दुकानाच्या समोर पावसाळ्यातील पाणी जाण्यासाठी नाला आहे आणि त्याच्यावर सिमेंटच्या लाद्या लावण्यात आल्या आहेत. नाल्याच्यावरील सिमेंटच्या लादीवर तीन-चार लोक उभे होते. तर एक व्यक्ती पंक्चर काढत होता.
घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ व्हायरल… सोशल मीडियावर (Social Media) या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.