JOIN US
मराठी बातम्या / Viral / सापळ्यात पकडणाऱ्यांना शिताफीने दिला चकमा, बिबट्याचा VIDEO सोशल मीडियावर व्हायरल

सापळ्यात पकडणाऱ्यांना शिताफीने दिला चकमा, बिबट्याचा VIDEO सोशल मीडियावर व्हायरल

बिबट्या हा प्राणी तसा चपळ प्राण्यांपैकी एक आहे. मात्र सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यानुसार तुम्ही बिबट्याला केवळ चपळच नाही तर हुशारही म्हणाल.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 20 एप्रिल : बिबट्या हा प्राणी तसा चपळ प्राण्यांपैकी एक आहे. मात्र सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यानुसार तुम्ही बिबट्याला केवळ चपळच नाही तर हुशारही म्हणाल. आयएफएस ऑफिसर सुशांत नंदा यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये बिबट्याची हुशारी पाहून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. विद्या अथरेया नावाच्या युजरने हा व्हिडीओ शेअर केला आहे आणि तो सुशांत नंदा यांनी रीट्वीट केला आहे. यामध्ये आपण पाहू शकतो की एका विहीरीत बिबट्या अडकला होता. तर गावकऱ्यांनी त्याची सूटका करण्याचा प्रयत्न केला. याकरता गावकऱ्यांनी या पडक्या विहीरीत शिडी टाकली आणि त्यावर बिबट्या चढला. शिडीच्या दुसऱ्या टोकाला गावकऱ्यांकडून सापळा ठेवण्यात आला होता. त्यांच्या अपेक्षेप्रमाणे शिडीवरून चढल्यानंतर बिबट्या थेट सापळ्यात शिरायला हवा होता. पण झालं भलतंच. (हे वाचा- कुंभकर्णाला लाजवेल अशी झोप तर गर्जनेइतकं भीतीदायक घोरणं, सिंहाचा VIDEO व्हायरल ) शिडीवर चढल्यानंतर बिबट्यानी त्याची चालाखी दाखवली. शिडीवर चढल्यानंतर सापळा पाहून बिबट्या काही क्षणासाठी थबकला. जणू काही पुढच्या स्ट्रॅटजीचा तो विचार करत होता. आणि त्याने सापळ्यात न शिरता बाजुला असणाऱ्या गवतात घुसला आणि शेतमळ्यात जाऊन त्याने धूम ठोकली. या व्हिडीओतील लोकांच्या संभाषणावरून हा व्हिडीओ महाराष्ट्रातीलच आहे. मात्र नेमक्या कोणत्या भागातील आहे हे निश्चित नाही.

संबंधित बातम्या

व्हिडीओ शेअर करणाऱ्या युजरने लिहीलं आहे की, ‘या व्हिडीओतील माणसं आक्रमक नाही तर त्यांना कुतुहल आहे. हा व्हिडीओ जंगलातील नाही तर शेतजमिनीवरचा आहे. त्याचप्रमाणे बिबट्या प्रचंड हुशार होता मात्र ही माणसं त्याला मदत करत आहेत, हे त्याला कळलं का?’. हा व्हिडीओ सुशांत नंदा यांनी रिट्वीट केल्यानंतर खूप व्हायरल झाला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या