JOIN US
मराठी बातम्या / Viral / जिराफासारख्या दिसणाऱ्या प्राण्याच्या 'जंगल डेट'चा VIDEO व्हायरल, लोकांनी केल्या या कमेंट्स

जिराफासारख्या दिसणाऱ्या प्राण्याच्या 'जंगल डेट'चा VIDEO व्हायरल, लोकांनी केल्या या कमेंट्स

सोशल मीडियावर दोन प्राण्यांच्या व्हिडीओ सध्या खूप व्हायरल होत आहे. बघताक्षणी असे वाटेल की दोन जिराफ या व्हिडीओमध्ये आहेत पण निरखून पाहिल्यास लक्षात येईल की या व्हिडीओमध्ये दिसणारा प्राणी काहीसा वेगळा

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 23 मे : सोशल मीडियावर दोन प्राण्यांच्या व्हिडीओ सध्या खूप व्हायरल होत आहे. बघताक्षणी असे वाटेल की दोन जिराफ या व्हिडीओमध्ये आहेत पण निरखून पाहिल्यास लक्षात येईल की या व्हिडीओमध्ये दिसणारा प्राणी काहीसा वेगळा आहे. त्यांची मान आणि शरीरयष्टी जरी जिराफासारखी असली तरीही ते जिराफ नाही आहेत. इंडियन फॉरेस्ट ऑफिसर प्रवीण कासवान यांनी हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडीओतील प्राणी नेमका कोणता आहे हे जाणून घेण्यासाठी त्यावर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. तर हे जिफासारखे वाटणारे प्राणी जिराफ नसून Generuks आहेत. प्रवीण कासवान यांनी व्हिडीओ शेअर करताना असं कॅप्शन दिलं आहे की, ‘हे क्यूट प्राणी Generuks आहेत. ते डेटसाठी गेले आहेत, त्यावेळी नर Generuks त्याच्या पार्टनरला प्रभावित करण्यासाठी खूप प्रयत्न करत आहे.’ कासवान यांनी म्हटल्याप्रमाणे खरंच हा व्हिडीओ खूप Cute आहे. (हे वाचा- VIDEO : कार थांबवून सुरू होतं फोटोशूट, अचानक सिंहीणीनं उघडला दरवाजा आणि… )

या व्हिडीओवर काही मजेशीर तर काही कुतूहल दाखवणाऱ्या कमेंट्स लोकांनी केल्या आहेत.

संबंधित बातम्या

जाहिरात
जाहिरात

प्रवीण कासवान यांनी या व्हिडीओ बुधवारी शेअर केला आहे. त्यानंतर जवळपास 14 हजारांपेक्षा जास्त वेळा हा व्हिडीओ पाहिला गेला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या