फोटोतील हा खतरनाक पंजा कुणाचा?
दिल्ली, 17 जानेवारी : सोशल मीडियावर बरेच फोटो, व्हिडीओ व्हायरल होत असतात. यापैकी बरेच फोटो-व्हिडीओ हे आपल्या कल्पनेपलिकडील असतात. असाच हा फोटो. एका आयएफएस अधिकाऱ्याने आपल्या सोशल मीडियावर हा फोटो पोस्ट केला आहे. हे काय आहे, असंही त्याने विचारलं आहे. हा फोटो पाहताच तुम्ही गार पडला असाल. यामागील सत्य समजलं तर आणखीनच हादरून जाल.
आयएफएस अधिकारी डॉ.सम्राट गौडा यांनी शेअर केलेला हा फोटो. एका लाकडाखाली अडकलेला पंजा. ज्यावरील बोटं जांभळ्या रंगाची आहेत, तर नखांचा रंग काळा आहे. एखादा राक्षसी प्राणी लपला आहे असंच वाटतं. वास्तविक हा फोटोत काय लपलं आहे? असे विचारता युझर्सच्या उत्तराचा अक्षरशः पाऊस पडला आहे. अनेकांनी आपल्या परीने उत्तरे दिली आहेत. तर काहींनी हे काय आहे ते बरोबर ओळखले आहे. फार कमी लोकांना हे काय आहे ते समजलं. हे वाचा - काळ आला होता, वेळ नाही! 19 सेकंद ‘मृत’ होऊन महिला पुन्हा जिवंत झाली; चक्क घड्याळाने वाचवला जीव फोटो पाहून जंगलात भूतंही असतात अशी कमेंट काही जणांनी दिली आहे. यामागील सत्य जाणून घेण्याआधी तुम्हाला हे काय असावं असं वाटतं, ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. सम्राट गौडा यांनी हा भयानक फोटो टाकल्यानंतर त्याबाबत लोकांना विचारल्यानंतर याचं उत्तरही सांगितलं आहे. हा कोणत्या भूताचा किंवा खतरनाक प्राण्याचा हात नाही. खरंतर ी एक बुरशी आहे. हे वाचा - चित्त्याच्या शिकारीचा प्रयत्न मगरीला भोवला; पाण्यातच प्राण्याने केली भयंकर अवस्था, पाहा VIDEO ही बुरशी मशरूमसाराखी वाटते. मृत माणसाची बोटं म्हणूनही याला ओळखता. ही बुरशी मृत झाडांच्या किंवा वाळलेल्या झाडांच्या पायथ्याशी वाढतात. ती मातीच्या संपर्कातही आणि देठावरही वाढते.
कॉन्ज्युरिंग या हॉरर चित्रपटातील भुतासारखी ही बुरशी दिसते असेही एकाने म्हटले आहे.