JOIN US
मराठी बातम्या / Viral / एटीएम कार्ड सोडा अख्खं ATM मशीनच घरी आणलं; नवऱ्याने बायकोला दिलं Unique Birthday gift

एटीएम कार्ड सोडा अख्खं ATM मशीनच घरी आणलं; नवऱ्याने बायकोला दिलं Unique Birthday gift

सुरुवातीला पत्नीला हे डमी एटीएम वाटलं पण जेव्हा त्यातून पैसे निघाले, तेव्हा ती शॉक झाली.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

जकार्ता, 25 फेब्रुवारी : आपल्या पार्टनरला (Couple) खूश ठेवण्यासाठी लोक काय काय नाही कर. विशेषतः काही पुरुष बायको (Husband wife) असो वा गर्लफ्रेंड तिच्या चेहऱ्यावर आनंद पाहण्यासाठी तिला सरप्राईझ देत असतात (Husband surprise gift to wife’s birthday) . वेगवेगळे गिफ्ट देत असतात. जो तो आपल्याला परवडेल असं गिफ्ट देतो. कुणी डायमंड किंवा सोन्याची अंगठी देतं तर कुणी गुलाबाचं फूल देतं. तर कुणी जोडीदाराच्या आवडीचं किंवा यापेक्षा वेगळं हटके गिफ्ट देतात. पण एका व्यक्तीने आपल्या पत्नीला असं गिफ्ट दिलं आहे, ज्याचा तुम्ही विचारही केला नसेल. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण या व्यक्तीने आपल्या बायकोला चक्क एटीएम गिफ्ट केलं आहे (ATM As Birthday Gift). इंडोनेशियातील रफी अहमदची पत्नी नागिता स्लाविनाचा बर्थ डे होता. रफीने नागिताला तिच्या वाढदिवला एटीएम गिफ्ट केले. रफीने आपल्या या युनिक गिफ्टचा व्हिडीओही आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. हे गिफ्ट पाहिल्यानंतर त्याच्या बायकोला आश्चर्याचा धक्काच बसला. तिला विश्वासच बसत नव्हता. हे वाचा -  अरे बापरे! अंडरवेअरमुळे संसारात वादळ; भडकलेल्या बायकोची नवऱ्याला घटस्फोटाची धमकी सुरुवातीला तिला वाटलं की तिचा नवरा तिच्यासोबत मस्करी करत आहे, हे डमी एटीएम आहे. पण जेव्हा ती एटीएममधून पैसे काढायला गेली तेव्हा त्यातून खरोखर पैसे आले आणि ती शॉक झाली. पर्सनल एटीएम कुणाचं कसं काय असू शकतं, असा प्रश्न तुम्हालाही पडला आहे. याबाबत बँक नेगरा इंडोनेशियाने सांगितलं की, हे एटीएम पूर्णपणे लीगल आहे. रफी त्यांंच्या बँकेतील महत्त्वाच्या क्लाइंट्सपैकी एक आहेत. त्यामुळे त्याला बँकेने पर्सनल एटीएम दिलं. जोपर्यंत त्यांच्या अकाऊंटमध्ये पैसे आहेत, तोपर्यंत या एटीएममधून ते पैसे काढू शकतात. हे वाचा -  5 वर्षाच्या रिलेशननंतर केलं लग्न, पण पतीचं ते समजताच हादरली नवरी; दिला घटस्फोट मिळालेल्या माहितीनुसार,  एटीएएम कपलच्या एंटरटेन्मेंट कंपनीच्या परिसरात लावलं जाणार आहे. जेणेकरून कंपनीतील कर्मचारीही या एटीएमचा वापर करू शकतील. फक्त पत्नीला सरप्राईझ देण्यासाठी म्हणून या एटीएमची डिलीव्हरी त्याने घरी मागवली. आता योग्य ठिकाण पाहून तिथं हे एटीएम इन्स्टॉल केलं जाईल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या