JOIN US
मराठी बातम्या / Viral / पत्नी कर्ज काढून देत नाही म्हणून पतीने घेतला तिच्या नाकाचा चावा, धक्कादायक प्रकार समोर

पत्नी कर्ज काढून देत नाही म्हणून पतीने घेतला तिच्या नाकाचा चावा, धक्कादायक प्रकार समोर

मध्य प्रदेशातल्या शिवपुरीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. तिथे एका व्यक्तीनं त्याच्या पत्नीचं नाक दातानं चावलं.

जाहिरात

क्राईम

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 3 फेब्रुवारी :  मध्य प्रदेशातल्या शिवपुरीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. तिथे एका व्यक्तीनं त्याच्या पत्नीचं नाक दातानं चावलं. या घटनेत सुखबती जाटव (वय 35) ही महिला गंभीर जखमी झाली. ही घटना शिवपुरी जिल्ह्यातल्या करैरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वॉर्ड क्रमांक 8 मध्ये गुरुवारी (2 फेब्रुवारी 2023) दुपारच्या सुमारास घडली. या प्रकरणी सुखबती जाटव यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिली असून, त्यावरून त्यांचा आरोपी पती अमरसिंह याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला. घटनेनंतर आरोपी फरार झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुखबती जाटव या अंगणवाडी सहायक म्हणून काम करतात. गुरुवारी दुपारी त्या घराबाहेर बसल्या होत्या. त्याच वेळी त्यांचा पती अमरसिंह तिथे आला आणि म्हणाला, की ‘मला पैशांची गरज आहे. तू तुझ्या नावावर कर्ज काढ.’ पतीच्या वाईट सवयींबद्दल माहिती असल्याने सुखबती यांनी कर्ज काढण्यास नकार दिला. त्यामुळे अमर सिंह त्यांच्याशी वाद घालू लागला. अमरसिंह याने सुखबती यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. रागाच्या भरात त्याने पत्नीच्या नाकाचा चावा घेतला. तो चावा इतका जोरात होता, की सुखबती यांचं नाक कापलं गेलं. हेही वाचा   -  VIDEO: 80 पेक्षा अधिक वर्षे जगतात या ठिकाणाचे लोक, काय आहे कारण? पीडितेच्या किंकाळ्या ऐकून शेजाऱ्यांनी लगेच डायल 100वर माहिती दिली. त्यानंतर डायल 100चं पथक घटनास्थळी पोहोचले आणि जखमी महिलेला पोलीस ठाण्यात आणले. नंतर तिच्यावर वैद्यकीय उपचार करण्यात आले. जखमी सुखबती यांनी करैरा पोलीस ठाण्यात स्वतःच्या पतीविरुद्ध फिर्याद दिली. त्यावरून आरोपी अमरसिंहच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. घटनेनंतर आरोपी अमरसिंह फरार झाला आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

अमरसिंहला हवं होतं दोन लाख रुपयांचं कर्ज पीडिता सुखबती यांनी सांगितलं, की, ‘माझा पती अमरसिंह याला माझ्या नावावर दोन लाख रुपयांचं कर्ज काढायचं होते; पण त्याची चुकीची कृत्यं पाहून मी त्याला विरोध करत होते. या मुद्द्यावरून गुरुवारी आमचं भांडण झालं. मी कर्ज घेण्यास नकार दिला, तेव्हा रागाच्या भरात त्याने दातांनी माझ्या नाकाचा चावा घेतला.’ या घटनेची सध्या शिवपुरी परिसरात चर्चा सुरू आहे. पोलिसांनी फरार आरोपी अमरसिंह याच्या मुसक्या आवळण्यासाठी त्याचा कसून शोध सुरू केलाय.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या