मोटरमननेच लोकलसमोर मारली उडी

मुंबईमधून मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. 

एका मोटरमनने रेल्वेसमोर उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 

या घटनेचा लाइव्ह व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

26 जानेवारी दुपारी 12.47 च्या सुमारास राकेश गौड यांनी धावत्या लोकल समोर उडी मारून जीवन संपवलं.

राकेश गौड पश्चिम रेल्वेमध्ये मोटरमन म्हणून कार्यरत होते.

रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गौड हे कुठल्या तरी आजाराने ग्रस्त होते. 

त्यामुळे आजारापणाला कंटाळून त्यांनी हे पाऊल उचललं असल्याचं सांगितलं जात आहे. 

 ट्रेन येताना पाहताच त्यांनी टोकाचं पाऊन उचललं. 

गौड यांनी रुळावर उडी मारली आणि खाली झोपले. अंगावरुन ट्रेन गेल्यावर जागीच त्यांचा मृत्यू झाला.