मुंबई, 27 जून : अद्यापही राज्यात कोरोनाची (Coronavirus) प्रभाव पाहता सर्वसामान्यांसाठी लोकल सुरू करण्यात आलेली नाही. गेल्या दीड वर्षांहून जास्त काळापासून देशावर कोरोनाच्या परिणाम पाहायला मिळत आहे. या काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. बेरोजगार (Jobless) झालेल्या तरुणांसमोर भविष्याचा प्रश्न आ वासून उभा आहे. अशा वेळी काय करायचं हा सर्वांसमोर उभा राहिलेला मोठा प्रश्न आहे. सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर (Viral Video) व्हायरल होत आहे. परेल स्टेशनवर तिकीट नसल्या कारणाने या तरुणाला टिसीने पकडलं आहे. आणि त्याच्याकडून दंड भरण्याची मागणी करीत आहे. त्यानंतर तरुणाने व्हिडीओच्या माध्यमातून आपला अनुभव कथन केला आहे. गेल्या दीड वर्षांपासून नोकरी नसल्यामुळे घरातच असल्याचं त्याने सांगितलं. या दरम्यान आई-वडिलांचे टोमणे खावे लागत होते. अद्यापही सर्वसामान्यांना लोकलने प्रवास करण्याची परवानगी नाही. दरम्यान अनेक जणांना दंड ठोठावण्यात येत आहे. या तरुणालाही असाच अनुभव आला. त्याने आपल्या मनातील दु:ख या व्हिडीओच्या माध्यमातून कथन केलं आहे. हे ही वाचा- परिस्थिती गंभीर! 8 राज्यांतच डेल्टाची 50% प्रकरणं; सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात कसं बसं प्रयत्न करुन दुसरी नोकरी मिळाली, मात्र नोकरीच्या दुसऱ्या दिवशी त्याच्याकडून दंडाची मागणी केली जात आहे. धक्कादायक म्हणजे त्याच्या अकाऊंटमध्ये अवघे 400 रुपये असल्याचं त्याने सांगितलं. एकेकाळी 35,000 रुपये कमावणारा मी, आता माझ्या अकाऊंटमध्ये अवघे 400 रुपये असल्याचं दु:ख त्याने व्यक्त केलं.
या तरुणासारखे असे अनेक तरुण या प्रश्नांचा सामना करीत आहे. लॉकडाऊनमध्ये अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, तर दुसरी शोधून कामात रुजू व्हायचं तर लोकल बंद, अशा वेळी भविष्याचा ज्वलंत प्रश्न तरुणांसमोर आ वासून उभा आहे. सोशल मीडिया न्यूजने हा व्हिडीओ प्रसिद्ध केलं आहे. सध्या या व्हिडीओवर मोठ्या प्रमाणात नागरिक प्रतिक्रिया देत आहेत.