JOIN US
मराठी बातम्या / Viral / बापरे! हा नवा व्हायरस की आणखी काही? पाहा या छिद्र असलेल्या हातामागील नेमकं सत्य

बापरे! हा नवा व्हायरस की आणखी काही? पाहा या छिद्र असलेल्या हातामागील नेमकं सत्य

एका इन्स्टाग्राम युझरने हाताचा भयानक फोटो टाकत हा नव्या आजाराचा परिणाम असल्याचा दावाही केला.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 07 जानेवारी : सध्या सर्वजण कोरोनाव्हायरसच्या (Coronavirus) दहशतीत आहेत. त्यात कोरोनाची डेल्टा, ओमिक्रॉन असे कितीतरी नवे व्हेरिएंट समोर येत आहेत, त्याचा धसका सर्वांनी घेतला आहे. अशात सोशल मीडियावरही काही ना काही फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. अशाच एका फोटो आणि व्हिडीओ पाहून सर्वांच्या काळजात धस्सं झालं आहे, तो म्हणजे छेद असलेला हात (Holes in hand). एका इन्स्टाग्राम युझरने हाताचा भयानक असा फोटो टाकला. कोरोनाने पिच्छा सोडला नाही आणि आता हे नवं संकट काय आहे. असं कॅप्शन त्याने या पोस्टला दिलं आहे. नव्या आजारामुळे हाताची अशी अवस्था झाल्याचा दावा या युझरने केला आहे. हाताचा इतका विचित्र फोटो पाहून सर्वांनाच धडकी भरली. खरंच हा कोणत्या नव्या व्हायरसचा परिणाम आहे, नवा आजार आहे की आणखी काही, असे बरेच प्रश्न सतावू लागले आहेत. सोशल मीडियावर याबाबत सर्च केलं असता हा फोटो 2017 सालीसुद्धा व्हायरल झाला होता असं समजलं. त्यावेळी लोकांनी एका आजारामुळे हातांची असा अवस्था होते, हातांमध्ये छिद्र पडतात असा दावा केला होता. पण आता यामागील सत्य समोर आलं आहे. हे वाचा -  चॅलेंज जिंकण्यासाठी माधुरीने बकाबका खाल्ले मोमोज; काय अवस्था झाली पाहा VIDEO Caters Clips न्यूज एजेन्सीने आपल्या यूट्युब चॅनेलवर दिलेल्या माहितीनुसार छिद्र असलेल्या या हातांचा व्हायरल होणारा हा फोटो किंवा व्हिडीओमागील सत्य वेगळं आहे.

28 वर्षांची ब्रिजेट ट्रेविनो (Bridgette Trevino) या मेकअप आर्टिस्टने (Make Artist Hand Design Shock people) केलेली ही हँड पेंटिंग आहे. हे वाचा -  OMG! हे कसं शक्य आहे? जिवंत बेडकाच्या पोटात पेटते लाइट; VIDEO VIRAL मेकअप आर्टिस्टच्या मते, 2017 साली जेव्हा ही पोस्ट व्हायरल झाली तेव्हा लोकांना धक्का बसला. हातावरील हा मेकअप लोकांना इतका खरा वाटला की लोक घाबरू लागले. आजही हा व्हिडीओ व्हायरल होतो. हा व्हिडीओ इतका भयंकर आहे की त्यावेळी ब्रिजेटला व्हिडीओवर हा हात खरा नाही तर मेकअप केलेला आहे, जी फक्त एक डिझाइन आहे, अशी सूचनाही जारी करावी लागली होती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या