JOIN US
मराठी बातम्या / Viral / आठव्या मजल्याच्या बाल्कनीमधून वडिलांनी दिला मुलीला झोका आणि... धक्कादायक VIDEO व्हायरल

आठव्या मजल्याच्या बाल्कनीमधून वडिलांनी दिला मुलीला झोका आणि... धक्कादायक VIDEO व्हायरल

सोशल मीडियावर सध्या व्हायरल होणारा एक व्हिडीओ हृदयाचे ठोके वाढवणारा ठरतो आहे. या व्हिडीओमध्ये 80 फुट उंचीवर असणाऱ्या एका बाल्कनीमध्ये एक वडील त्यांच्या मुलीला झोका देत आहेत.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

प्यूअर्तो रिको, 21 मे : सोशल मीडियावर सध्या व्हायरल होणारा एक व्हिडीओ हृदयाचे ठोके वाढवणारा ठरतो आहे. या व्हिडीओमध्ये 80 फुट उंचीवर असणाऱ्या एका बाल्कनीमध्ये एक वडील त्यांच्या मुलीला झोका देत आहेत. प्यूअर्तो रिको याठिकाणचा असणारा हा व्हिडीओतील व्यक्तीवर सोशल मीडियावर खूप टीका केली जात आहे. व्हिडीओमध्ये पाहिल्यानंतर लक्षात येते की किती खतरनाक पद्धतीने हे वडील त्यांच्या मुलीला झोका देत आहेत.

Just because you cannot go to the park does not mean you can risk your childs life… from r/insaneparents

4 दिवसांपूर्वी रेड्डीट (Reddit) वर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये तिचे वडील मुलीला खूप उंच झोका देताना दिसत आहेत, त्यामुळे काही क्षणासाठी हृदयाचे ठोके थांबल्यासारखे वाटते. जवळपास 2000 पेक्षा जास्त कमेंट्स या व्हिडीओवर आल्या असून जवळपास सर्वांनीच या वडिलांवर टीका केली आहे. (हे वाचा- अजब आहे राव! चोरी करण्यासाठी मास्क ऐवजी घालून आले कलिंगड, PHOTO VIRAL ) द मिरर ने अशी माहिती दिली आहे की, हा व्हिडीओ मॅक्सिकन हेराल्डचे पत्रकार जोनाथन पाडिला यांनी चित्रित केला आहे. शनिवारी त्यांनी हा व्हिडीओ शेअर करत असे म्हटले होते की, ‘कोरोना व्हायरस दरम्यान या वडिलांनी त्यांच्या मुलीला बाल्कनीमध्ये झोका दिला.’ झोपाळ्यावर झुलवताना यावेळी त्या इसमाने कोणत्याही प्रकारची खबरदारी देखील घेतली नाही आहे. रेड्डीटवर ज्या युजरने हा व्हिडीओ शेअर केला आहे त्याने म्हटले आहे की, ‘तुम्ही लॉकडाऊनमध्ये पार्कात नाही जाऊ शकत याचा अर्थ असा नव्हे की तुम्ही तुमच्या मुलांचे आयुष्य धोक्याच आणाल.’

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या