JOIN US
मराठी बातम्या / Viral / चक्क पक्षाने केली हरणाची शिकार; VIDEO पाहून बसणार नाही डोळ्यावर विश्वास

चक्क पक्षाने केली हरणाची शिकार; VIDEO पाहून बसणार नाही डोळ्यावर विश्वास

व्हिडिओमध्ये दिसतं की एक गरूड आकाशातून उडत जमिनीवर येतो आणि खाली शेतात फिरणाऱ्या एका हरणाच्या पिल्लावर आपल्या पंज्याने हल्ला करतो.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली 17 फेब्रुवारी : गरूड हा एक शिकारी पक्षी आहे. अनेकदा तर तो आपल्यापेक्षा कितीतरी मोठ्या प्राण्यांचीही शिकार करत. आपण अनेकदा पाहिलं असेल की गरूड आकाशातून जमिनीवर येत आपली शिकार पायांमध्ये पकडून पुन्हा हवेत उडतो. सध्या गरूडाचा असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक गरूड चक्क हरणाची शिकार करताना दिसतो (Hawk Attack on Deer). हा व्हिडिओ पाहून तुम्हीही हैराण व्हाल (Shocking Video Viral). मेहुण्यांनी दाजीला खुर्चीवरुन खाली ओढलं आणि…, कधीही पाहिला नसेल असा Video व्हिडिओमध्ये दिसतं की एक गरूड आकाशातून उडत जमिनीवर येतो आणि खाली शेतात फिरणाऱ्या एका हरणाच्या पिल्लावर आपल्या पंज्याने हल्ला करतो. गरूड या हरणाच्या पिल्लाचं शिंग पकडून त्याला जमिनीवर आदळतो. व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं की हरणाचं पिल्लूही गरूडासोबत लढण्याचा आणि स्वतःचा बचाव करण्याचा भरपूर प्रयत्न करतं. मात्र गरूड त्याच्यावर सरस ठरतं. गरूड आपले ताकदवर पंजे आणि पंखाच्या मदतीने हरणावर हल्ला करतं.

संबंधित बातम्या

व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं की गरूड अनेकदा या हरणाच्या पिल्ला खाली पाडतं. मात्र व्हिडिओमध्ये पुढे हे दाखवलं गेलं नाही की खरंच गरूडाने हरणाची शिकार केली का. मात्र व्हिडिओमध्ये गरूडाची ताकद पाहता असं वाटत नाही की हरणाचं पिल्लू त्याच्या तावडीतून सुटलं असेल. आगीतून फुफाट्यात! मगरीच्या तावडीतून वाचलं पण बिबट्याच्या हाती लागलं हरीण, VIDEO हा हैराण करणारा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर animals.energy नावाच्या अकाऊंटवरुन शेअर केला गेला आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत 10 मिलियनहून अधिकांनी पाहिला आहे. तर आतापर्यंत 1 लाख 35 हजारहून अधिकांनी लाईक केला आहे. या व्हिडिओवर लोक निरनिराळ्या कमेंट करत आहेत. एका यूजरने व्हिडिओ पाहून लिहिलं, की उपाशी गरूडाने इतक्या मोठ्या प्राण्यावर हल्ला करणं आश्चर्यकारक आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या