मंत्रांनी हवनकुंडात अग्नी प्रज्वलित. (प्रतीकात्मक फोटो/सौजन्य - Canva)
मुंबई, 06 डिसेंबर : फक्त मंत्रांनी काहीही करणं हे तुम्ही धार्मिक कार्यक्रमात किंवा काल्पनिक फिल्ममध्ये पाहिलं असेल. पण प्रत्यक्षात हे शक्य नाही हे तुम्हाला माहिती आहे. असं असताना सध्या सोशल मीडियावर मात्र असा व्हिडीओ व्हायरल होतो आहे, जो पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे. या व्हिडीओत एक पंडित फक्त मंत्राने आग पेटवताना दिसतो आहे. हा व्हिडीओ पाहणारा प्रत्येक जण हैराण झाला आहे. हिंदू धर्मात मंत्राचं खूप महत्त्व आहे. वेद-पुराणांमध्ये बरेच मंत्र आणि त्यांच्या शक्तीबाबत सांगण्यात आलं आहे. त्यामुळे कोणतंही शुभकार्य, धार्मिक कार्यक्रम असेल तर मंत्रोच्चरासह पूजा केली जाते. असाच हा व्हिडीओ आहे. ज्यात एका ठिकाणी होमहवन केलं जात आहे. पण पंडित माचिसने नव्हे तर मंत्रांनी यज्ञ पेटवताना दिसले. हे वाचा - लक्ष्मीरूपी लेकीचा ‘चमत्कार’! मुलीला जन्म देताच फळफळलं महिलेचं नशीब; बनली लखपती व्हिडीओत तुम्ही पाहू शकता काही लोक बसले आहेत आणि पंडित होमहवन करतो आहे. हवनकुंडाजवळ उभा राहून तो त्यामध्ये काय काय टाकतो आहे आणि त्यासोबत मंत्राचा उच्चार करताना दिसतो आहे. त्यानंतर थोड्या वेळाने तो हवनकुंडापासून थोडा दूर उभा राहतो आणि मोठमोठ्या मंत्र उच्चारत राहतो. थोड्या वेळाने हवनकुंडातून धूर येताना दिसतो आणि अचानक आगही प्रज्वलित होते. तिथं असलेले लोकही आश्चर्यचकीत होतात टाळ्या वाजवतात आणि हात जोडताना दिसतात. पंडितने फक्त मंत्रांनीच आग प्रज्वलित केली असा दावा केला जातो आहे. दोन दगडं एकमेकांवर घासून त्यातून निघणाऱ्या ठिणगीतून आग लागते हे तुम्हाला माहिती असेल. पण पटकन आग पेटवण्यासाठी म्हणून सामान्यपणे आपण आता माचिसचा वापर करतो. पण मंत्रामार्फत आग शक्यच नाही. पण या व्हिडीओत मात्र तसं घडताना दिसतं आहे. त्यामुळे हा व्हिडीओ पाहून सर्वजण हैराण झाले आहेत. हा व्हिडीओ नेमका कुठला आणि कधीचा आहे माहिती नाही. हे वाचा - मंदिरात चोरी करायला गेला चोर; समोर देव दिसताच जे केलं ते पाहून चक्रावून जाल, VIDEO दरम्यान न्यूज 18 लोकमत या व्हिडीओबाबत करण्यात आलेल्या दाव्याला दुजोरा देत नाही. हा व्हिडीओ कितपत सत्य आहे हे माहिती नाही.
या व्हिडीओबाबत तुमची प्रतिक्रिया किंवा हे असं का घडलं याबाबत तुम्हाला काही अधिक माहिती असेल तर आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन आम्हाला नक्की सांगा.