JOIN US
मराठी बातम्या / Viral / घटम्, वीणा, गिटारच्या सुरात 'है अपना दिल तो आवारा'; पुन्हा पुन्हा ऐकावंसं वाटेल हे गाणं

घटम्, वीणा, गिटारच्या सुरात 'है अपना दिल तो आवारा'; पुन्हा पुन्हा ऐकावंसं वाटेल हे गाणं

अशा अंदाजात है अपना दिल तो आवारा कितीही वेळा ऐकलं तरी तुमचं मन भरणार नाही.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 12 ऑगस्ट : ‘है अपना दिल तो आवारा’ (Hai apna dil to awara) हे गाणं जुन्या फिल्ममधील असलं तरी आजच्या तरुणांमध्येही प्रसिद्ध (Hai apna dil to awara song)  आहे. आजही किती तरी जणांच्या तोंडावर हे गाणं असतं. या गाण्याचं म्युझिक मनाला एक वेगळाच आनंद देतं. पण हेच गाणं आज आम्ही तुम्हाला वेगळ्या म्युझिकमध्ये ऐकवणार आहोत. ज्यामुळे तुम्ही या गाण्याच्या प्रेमात आणखीनच पडाल. शिट्टीने तुम्ही कधी ना कधी हे गाणं गुणगुणलं असेल. तसंच हार्मोनिका, हार्मोनिअम अशा वाद्यांमधूनही तुम्ही या गाण्याचे सूर ऐकले असतील. पण आता अशा वाद्यांमधून या गाण्याचे सूर उमटले आहेत, ज्याचा तुम्ही कधी विचारही केला नसेल.

संबंधित बातम्या

घटम्, वीणा आणि गिटारच्या सुरात है अपना दिल तो आवारा गाणं ऐकायला कसं वाटेल. फार विचार करत बसू नका. थेट इथं ऐकाच. हे वाचा -  कोंबड्यालाही लागली दारूची चटक; पाण्याच्या ग्लासकडे ढुंकूनही पाहेना; Video viral व्हिडीओत तीन महिला  घटम, वीणा आणि गिटार हातात घेऊन हे गाणं वाजवताना दिसतात. या तिन्ही वाद्यांच्या सुरात जेव्हा हे गाणं ऐकतो, तेव्हा मनाला एक वेगळीच प्रसन्नता वाटते. हे गाणं पुन्हा पुन्हा ऐकत राहावं असंच वाटतं. खरंच अपना दिल आवारा झाल्यासारखं वाटतं हो की नाही. हे वाचा -  असा नाचला असा नाचला; अखेर ढोलवाल्याने ढोल सोडून त्यालाच बडवलं; पाहा Funny dance आयपीएस अधिकारी रुपिन शर्मा यांनी आपल्या ट्विटरवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. प्रत्येकाला हा व्हिडीओ आवडतो आहे. या सुरांनी सर्वांचं मन जिंकून घेतलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या