JOIN US
मराठी बातम्या / Viral / मेहुण्याच्या गर्लफ्रेंडसोबत केली विचित्र मस्करी; लग्नातच नवरदेवामुळे लागलं भांडण

मेहुण्याच्या गर्लफ्रेंडसोबत केली विचित्र मस्करी; लग्नातच नवरदेवामुळे लागलं भांडण

एका सोशल मीडिया यूजरनं आपल्या दाजीच्या या कृत्याबाबत सांगितलं. त्यानं सांगितलं, की लग्नाच्या वेळीच नवरदेवाने (Groom) त्याच्या गर्लफ्रेंडच्या ड्रेसवर दूध सांडवलं आणि म्हटलं की तो चेष्टा करत नाहीये.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

लंडन 07 ऑक्टोबर : चेष्टा-मस्करी (Prank) करणं चांगली गोष्ट आहे. मात्र, ही मस्करी कधी, कशी आणि कुठे करावी, याची समज असणं गरजेचं आहे. अन्यथा मोठी समस्या निर्माण होऊ शकते. सध्या एका नवरदेवाची अशीच फजिती सोशल मीडियावर व्हायरल (Viral on Social Media) होत आहे. त्याच्या मस्करी करण्याच्या सवयीमुळे लग्नातच (Wedding) भांडणाला सुरुवात झाली. अचानक महिलेच्या डोक्यातून येऊ लागलं रक्त अन्…; हा VIDEO पाहून बसेल धक्का मिररनं दिलेल्या वृत्तानुसार, एका सोशल मीडिया यूजरनं आपल्या दाजीच्या या कृत्याबाबत सांगितलं. त्यानं सांगितलं, की लग्नाच्या वेळीच नवरदेवाने (Groom) त्याच्या गर्लफ्रेंडच्या ड्रेसवर दूध सांडवलं आणि म्हटलं की तो चेष्टा करत नाहीये. यामुळे त्याची गर्लफ्रेंड नाराज झाली. याच गोष्टीवरुन या मुलीच्या घरच्यांचं नवरदेवासोबत भांडण झालं. मात्र, तो आपली चूक मान्य करायला तयार नव्हता. या नवरदेवाच्या मेहुण्याच्या गर्लफ्रेंडनं (Girlfriend) 250 पाउंडचा (जवळपास 25 हजार रुपये) ड्रेस घातला होता. जेव्हा लग्नात सगळे पाहुणे जेवण करत होते, तेव्हा नवरदेव हातात दुधाचा ग्लास घेऊन तिथे आला आणि हे दूध आपल्या मेहुण्याच्या गर्लफ्रेंडच्या अंगावर ओतलं. यानंतर नवरदेव जोरजोरानं हसू लागला. जेव्हा मुलीच्या घरच्यांनी नाराजी व्यक्त केली तेव्हा नवरदेवानं म्हटलं, की तो मस्करी करत होता. अचानक महिलेच्या डोक्यातून येऊ लागलं रक्त अन्…; हा VIDEO पाहून बसेल धक्का मुलीच्या कुटुंबीयांचं असं म्हणणं आहे, की त्यांच्या जावयानं आपल्या या घाणेरड्या चेष्टेसाठी भरपाई द्यायला हवी. त्यांची अशी इच्छा आहे, की नवरदेवानं या ड्रेसची पूर्ण किंमत त्यांना नुकसान भरपाई म्हणून द्यावी. मात्र, नवरीबाई याच्या विरोधात आहे. तिनं आपल्या कुटुंबीयांविरोधातच गोष्ट उगीचच वाढवल्याचा आरोप करत म्हटलं, की दूध सांडल्यानं लगेचच ड्रेस खराब होत नाही. तिनं म्हटलं, की या घटनेसाठी माफ करणंच भरपूर आहे. मात्र, नवरीचा भाऊ या मताशी सहमत नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या