JOIN US
मराठी बातम्या / Viral / VIDEO - भरमंडपातच त्याने मित्राला...; लग्नात नवरदेवाचं असं रूप पाहून नवरीबाईही स्तब्ध झाली

VIDEO - भरमंडपातच त्याने मित्राला...; लग्नात नवरदेवाचं असं रूप पाहून नवरीबाईही स्तब्ध झाली

नवरदेव आणि त्याच्या मित्राने लग्नात जे केलं त्यामुळे हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे.

जाहिरात

नवरदेवाने मित्रासोबत जे केलं ते पाहून सर्वजण थक्क.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 10 डिसेंबर : लग्नाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. काही मजेशीर असतात, काही इमोशनल असतात. असाच लग्नाचा एक व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. याचं कारणही तसंच आहे. भरमंडपात नवरदेवाने आपल्या मित्रासोबत असं काही केलं की त्यामुळे सर्वजण थक्क झाले आहेत. नवरीसह लग्नातील प्रत्येक जण पाहतच राहिला आहे.

नवरदेव आणि त्याच्या लग्नात आलेला त्याचा मित्र चर्चेचा विषय ठरत आहे. लग्नात नवरीबाईने आपल्या होणाऱ्या नवऱ्याचं असं रूप पाहिलं की ती पाहतच राहिली. इतका चर्चेत आलेला आणि व्हायरल होणारा हा व्हिडीओ. असं या नवरदेवाने आणि त्याच्या मित्राने लग्नात नेमकं केलं तरी काय हे पाहण्याची उत्सुकता आता तुम्हालाही लागली असेल.

हे वाचा -  लग्नाच्या मंडपात गेली पण नवरदेवाचा चेहरा पाहताच भडकली नवरी, स्टेजवरच अशी घडवली अद्दल, VIDEO

व्हिडीओत तुम्ही पाहू शकता नवरदेवाचा मित्र अचानक त्याच्या लग्नात येतो. त्याला पाहून नवरदेव शॉक होतो आणि भावुकही होतो. तो नवरीला सोडून मित्राकडे जातो. त्याला अगदी घट्ट मिठी मारतो आणि ढसाढसा रडतो. मित्राला समोर पाहून तो इतका भावुक होतो की त्याच्या डोळ्यातून पाणी येतं. तो अक्षरशः मोठमोठ्याने रडू लागतो.

त्यांच्याजवळ असलेल्या महिलेलाही आपले अश्रू रोखता येत नाही. तीसुद्धा रडत डोळे पुसताना दिसते. कसंबसं दोघे मित्र एकमेकांपासून वेगळे होतात आणि त्यांच्या शेजारी असलेल्या महिलेला दोघंही मिठी मारतात. लग्नाच्या इतक्या आनंदाच्या क्षणात नवरदेवाचे अश्रू काही थांबवण्याचं नाव घेत नाही.

हे वाचा -  अवघ्या 10 सेकंदाच्या VIDEO चा सोशल मीडियावर धुमाकूळ; महिलेचा डान्स पाहून नजरच हटणार नाही

हा व्हिडीओ नेमका कुठला आणि कधीचा आहे माहिती नाही. @Gulzar_sahab ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. ‘ये दोस्ती हम कभी नहीं तोड़ेंगे’ असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे. अवघ्या  55 सेकंदाचा हा व्हिडीओ आहे. लाखो लोकांनी पाहिला आहे, हजारोंनी लाईक केला आहे. त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. जिगरी दोस्त असेच असतात, दोस्ती अशावी तर अशी… अशा प्रतिक्रिया युझर्सनी दिल्या आहेत.

संबंधित बातम्या

तुम्हाला हा व्हिडीओ पाहून काय वाटतं ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन नक्की सांगा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या