नवी दिल्ली 18 फेब्रुवारी : वय कितीही असो, जर काहीतरी नवीन शिकण्याची इच्छा मनात असेल तर कधीही काहीही शिकता येतं. असं म्हटलं जातं की यासाठी वयाचं काहीच बंधन नसतं. अनेकदा आपल्यासमोर अशा काही गोष्टी येतात, ज्या विचाराच्या पलिकडच्या असतात आणि ते पाहून आपला डोळ्यांवर विश्वास बसत नाही. एका वृद्ध महिलेनंही असंच काहीसं करून दाखवलं. आश्चर्य! रस्त्यावरून अचानक हवेत उडू लागली कार; विश्वास बसत नाही तर पाहा VIDEO वृद्ध महिलेचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे (Grandma’s spunky English). यात ही महिला ज्या पद्धतीने इंग्लिश बोलते, ते ऐकून तुम्हीही अवाक व्हाल. व्हिडिओ एका महिलेनं आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे. हा व्हिडिओ (Viral Video of Grandma) नेटकऱ्यांच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे.
सईद स्लीत शाह नावाच्या महिलेनं आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन काश्मिरी आजीबाईच्या अफलातून इंग्लिशचा हा व्हिडिओ शेअर केला आहे. अपलोड होताच हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. 37 सेकंदाचा हा व्हिडिओ आतापर्यंत 88 हजारहून अधिकांनी पाहिला आहे. तर, 2 हजार 500 हून अधिकांनी हा व्हिडिओ लाईक केला आहे. व्हिडिओमध्ये इंग्लिश बोलणारी ही महिला नेमकी कुठली आहे, हे माहिती नाही. मात्र तिच्या वेशभूषेवरुन त्या पहाडी गावातील असल्याचा अंदाज लावला जात आहे.
व्हिडिओमध्ये काश्मिरी वेशभूषेतील एक महिला एका व्यक्तीसोबत दिसत आहे. महिलेसोबत असलेला एक व्यक्ती तिच्यासमोर काश्मिरीमध्ये काही प्राणी, फळं आणि भाज्यांची नावं घेतो, यानंतर आजीबाई या शब्दांची इंग्रजी नावं सांगतात. आजीबाईने जेव्हा इंग्लिशमध्ये या शब्दांचा उच्चार केला तेव्हा सगळेच अवाक झाले. अशाप्रकारे उच्चार तर कदाचित कॉन्व्हेंटमध्ये शिकलेले विद्यार्थीही करू शकणार नाहीत. मात्र, या 80 वर्षीय महिलेची इंग्लिश आणि तिचे उच्चार मन जिंकणारे आहेत.