JOIN US
मराठी बातम्या / Viral / ओ तेरी! हातातील ग्लास काही क्षणात गायब; 'जादूगार' शिक्षकाचा VIDEO सोशल मीडियावर तुफान व्हायरल

ओ तेरी! हातातील ग्लास काही क्षणात गायब; 'जादूगार' शिक्षकाचा VIDEO सोशल मीडियावर तुफान व्हायरल

विद्यार्थ्यांना शिकवता शिकवता शिक्षकाने करून दाखवली जादू.

जाहिरात

शिक्षकाने शिकवताना केली 'जादू'

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

दिल्ली, 10 नोव्हेंबर : सोशल मीडियावर शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्याही बरेच व्हिडीओ व्हायरल होत असतात. अशाच एका शिक्षकाच्या व्हिडीओने सध्या सर्वांचं लक्ष वेधलं आहे. फिजिक्स शिकवणाऱ्या या शिक्षकाने विद्यार्थ्यांना जादू करून दाखवली आहे. डोळ्यांची पापणी लवण्याआधी त्याने त्याच्या हातातील ग्लास गायब करून दाखवला आहे. जादूगार शिक्षकाचा हा व्हिडीओ पाहून सर्वजण थक्क झाले आहेत. प्रत्येक शिक्षकाची शिकवण्याची एक वेगळी पद्धत असते. शिकवण्याच्या हटके शैलीसाठी हे शिक्षक प्रसिद्ध असतात. अशाच शिक्षकांपैकी हा एक शिक्षक आहे. ज्याने शिकवता शिकवता जादू करून त्याच्यासमोरील विद्यार्थीच नाही तर सोशल मीडियावर कित्येक नेटिझन्सचं मन जिंकलं आहे. असं या शिक्षकाने नेमकं केलं तरी काय पाहुयात. हे वाचा -  VIDEO - अतिउत्साह पडला महागात! एका विद्यार्थ्याने दुसऱ्या विद्यार्थ्यासोबत असं काही केलं की मास्तरांनी चोप चोप चोपलं व्हिडीओत तुम्ही पाहू शकता शिक्षकाच्या हातात दोन काचेचे ग्लास आहेत. एक ग्लास छोटा आणि एक ग्लास मोठा आहे. शिक्षक मोठ्या ग्लासच्या आत छोटा ग्लास ठेवतात आणि विद्यार्थ्यांना ग्लासच्या आतील ग्लास दिसतो का, असं विचारतात. यावेळी ग्लासच्या आतील ग्लास स्पष्टपणे दिसतो.  त्यानंतर या दोन्ही ग्लासमध्ये ते तेल ओतात आणि अरे व्वा… हा काय चमत्कार… ग्लासच्या आतील ग्लास चक्क गायब होतो. पाहता पाहता ग्लास काही सेकंदातच दिसेनासा होतो. हा चमत्कार नेमका कसा झाला, असं का घडलं यामागील लॉजिकही शिक्षक विद्यार्थ्यांना सांगतात. यामागील स्पष्टीकरण देतात. हे वाचा -  शालेय विद्यार्थ्याने लिहिलं असं Leave Application; वाचून पोट दुखेल पण हसू आवरणार नाही @ragiing_bull ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. फक्त इंग्रजी बोलून चमकणारा नव्हे तर हा एक हाडाचा शिक्षक आहे, असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे. या शिक्षिकाची फिजिक्स शिकवण्याची स्टाईल सर्वांना आवडली आहे. त्याचं कौतुक केलं जातं आहे.

संबंधित बातम्या

तुम्हाला हा व्हिडीओ कसा वाटला, शिक्षकाची शिकवण्याची पद्धत कशी वाटली किंवा तुमचा अशा हटके शिकवणाऱ्या शिक्षकांबाबतचा काही अनुभव असेल तर आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन आम्हाला नक्की सांगा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या